दे.राजा : (एशिया मंच न्यूज )
गुरुपौर्णिमा निमित्त राजलक्ष्मी स्कूलमध्ये गुरूंसाठी कृतज्ञतेची भावना व्यक्त करणारा कार्यक्रम 10 जुलै रोजी उत्साहात व थाटात साजरा करण्यात आला.
गुरुपौर्णिमेनिमित्त एक भावपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या दिवशी विद्यार्थ्यांनी गुरुजी प्रति आपली कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने करण्यात आली.
शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. प्रियंका देशमुख, उपमुख्याध्यापक फेजल अस्मानी, शाळेचे सीईओ सुजित गुप्ता, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतीक्षा मॅडम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले.
यावेळी अभंग गायन ,श्लोक, पठण ,व नाटिकेच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या.
मनीषा जगताप यांनी गुरुपौर्णिमा निमित्त मार्गदर्शनात्मक भाषण केले. विद्यार्थ्यांनी गुरु शिष्य यांचे संबंध असलेली नाटिका सादर केली. ज्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक डॉ. रामप्रसाद शेळके, अध्यक्ष डॉ. मीनल शेळके यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली .
रामप्रसादजी शेळके यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी संत, पुष्पा माने यांनी अत्यंत प्रभावीपणे पार पाडले. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुनीता टेकाळे यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे सीईओ सुजित गुप्ता यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत गुरूंच्या मार्गदर्शनाचे महत्त्व पटवून दिले. सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने सर्व शिक्षकांना फुलांची बुके देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी शिक्षकांच्या चेहऱ्यावर समाधान भाव दिसत होते.कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.