* विद्यार्थ्यांनो आकाशी झेप घेण्याचे स्वप्न पहा, यश मिळतेच : प्रा.डी.एस. लहाने
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
यश मिळविणे आपल्याच हातात आहे. विद्यार्थ्यांनी चिकाटीने प्रयत्न केले तर कठीण वाटणाऱ्या यशाच्या शिखरावर जाता येते. भीती हा मोठा अडसर असतो, भीती मनातून काढून टाका, आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा , बघा तुम्ही यशाला गवसणी घातली असेल, असे प्रतिपादन प्रा. डी.एस. लहाने यांनी केले. कोलवड येथे त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि आकाशी झेप घेण्याचा सल्ला दिला.
माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा, डि. एस. लहाने यांनी मराठी पूर्व माध्यमिक शाळा कोलवड येथे स्पर्धा परीक्षा पुस्तके, स्काॕलरशिप परिक्षा पुस्तकांचे वाटप केले. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांना बोलते केले. 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण या विचार सरणीवर शिवसेनेचे राजकारण उभे आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा जाज्वल्य मराठी वारसा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुढे सुरू ठेवल्याचे सांगून त्यांनी उदंड आयुष्याच्या शुभेच्या दिल्या. पूर्वसंध्येला आयोजित या कार्यक्रमासाठी, अँड संदीप जाधव, गणेश जाधव, ओंकार पाटिल, सुनिल जाधव, विठ्ठल जाधव,संजय गायकवाड, दिनकर पांडे, पंजाबराव गवई, किरण पाटिल, शिवाजी शिंदे, सिद्धार्थ पाटिल, दिपक पाटिल, अखिल गवई, वैभव जाधव, अविनाश जाधव, हाफिज पठाण, प्रकाश जाधव राजू काका, शाळेचे मुख्याध्यापक नंदकिशोर गायकवाड , शिक्षक वर्ग यांनी सहकार्य केले.