केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतली आत्महत्याग्रस्त शेतकरी स्वर्गीय गणेश थुट्टे यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट* टोकाची भूमिका घेऊ नका : शेतकऱ्यांना केले आवाहन

केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतली आत्महत्याग्रस्त शेतकरी स्वर्गीय गणेश थुट्टे यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
*  टोकाची भूमिका घेऊ नका : शेतकऱ्यांना केले आवाहन
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
         केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज चिखली तालुक्यातील भरोसा येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी दांपत्याच्या घरी सांत्वनपर भेट देऊन  या शेतकरी कुटुंबीयांना धीर दिला. शेतकरी बांधवांनो टोकाची भूमिका घेऊ नका असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
         चिखली तालुक्यातील भरोसा येथील शेतकरी गणेश श्रीराम थुट्टे (वय ५५) आणि त्यांच्या पत्नी रंजना गणेश थुट्टे (वय ५०) यानी शेतकरी दांपत्याने गत आठवड्यात गळफास घेवून आत्महत्या केली.   या दांपत्याच्या आत्महत्येचं कारण हे हुमणी अळीचा प्रादुर्भाव शेतीतील पिकावर वाढल्याने पीक नष्ट झाली. त्यामुळे कर्जाचा बोजा वाढत असल्याने या शेतकरी दांपत्याने टोकाचे पाऊल उचलले . या संदर्भाची माहिती केंद्रीयमंत्री तथा बुलडाणा लोकसभा मतदार संघाचे खासदार प्रतापराव जाधव यांना समजली . सध्या अधिवेशन सुरू असल्यामुळे ते शनिवारी मेहकर येथे घरी आलेले असतांना त्यांनी आज 27 जुलै रोजी रविवारला चिखली तालुक्यातील भरोसा येथे स्वर्गीय गणेश श्रीराम थुट्टे घरी जावुन सांत्वनपर भेट घेतली. त्यांच्या कुटुंबीयांना धीर देत शासनातर्फे सर्वतोपरी मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली. निसर्गाचा प्रकोप झाला तरीही शेतकऱ्यांनी खचून जावु नका, सरकार तुमच्या पाठीशी आहे, असे टोकाचे पाऊल उचलू नका,  असे  आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना केले.
        यावेळी त्यांच्यासोबत
शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबुराव मोरे, तालुकाप्रमुख गजानन मोरे, संतोष भुतेकर, राजू पाटील, बाबुराव हाडे, पंजाबराव जावळे, अनमोल ढोरे, विष्णू घुबे यांच्यासह अन्य पदाधिकारी ग्रामस्थ तसेच कृषी आणि महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.