* बुलडाणा अर्बन सोलापूर विभागाच्या वतीने फराळाचे वाटप
सोलापूर : (एशिया मंच न्युज)
सर्वोत्तम व्यवस्थापन विश्वासार्हता नवीनतम तंत्रज्ञान, सामाजिक बांधिलकी हि मुल्य जोपासत बुलडाणा अर्बनच्या आजपर्यंतच्या यशस्वी वाटचाली मागे तेजस्वी नेतृत्वाचा खूप मोठा वाटा आहे. वारकरी संप्रदाय हा भारतातील एक प्रमुख भक्तीपंथ आहे. विठोबा या देवतावर असलेले प्रेम वारकरी भाविक गायन नृत्य, किर्तनातून व्यक्त करतात. अशा या सोहळ्या मध्ये आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकरी एकत्र येतात, ज्यामुळे समाजात एकता आणि समरसता वाढते.
यावेळी बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी यांच्या संकल्पनेतून व बुलडाणा अर्बनचे अध्यक्ष डॉ.सुकेश झंवर, सौ.कोमलताई झंवर यांच्या प्रेरणेतून सामाजिक बांधिलकीची मूल्य जोपासत संस्थेचे सरव्यवस्थापक कैलास कासट यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग सोलापूर -धाराशिवचे विभागीय व्यवस्थापक विलास कंकाळ, शाखा व्यवस्थापक यांच्याहस्ते शाखा पंढरपूर येथील पंढरी नगरीत जपलेली ग्राहकांची विश्वासार्हता सातत्याने पुढे नेहून आषाढी एकादशी निमित्ताने वारकरी व भाविक भक्तांना साबुदाणा खिचडी फराळ वाटप करण्यात आले. यावेळी या कार्याचे कौतुक वारकऱ्यांचे व थोरांचे आशीर्वाद तसेच स्थानिक संचालक मुकूंद मर्दा, किशोर सोमाणी , योगेश मर्दा, योगेश शर्मा, रमेश जगदाळे, सुरवसे , शाखा पंढरपूरचे वरिष्ठ शाखा व्यवस्थापक गोविंद कदम व सर्व कर्मचारी वृंद सभासद उपस्थित होते.