बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
आज आषाढी एकादशी निमित्त गोडबोले प्लॉट जांभरुण रोड बुलढाणा येथील गजानन महाराज संस्थान ट्रस्टच्या व्दारा गजानन महाराज पालखी पायीदिंडी सोहळा आज 6 जुलै रोजी मोठ्या उत्सहात काढण्यात आली.
सदर पायी पालखी पायीदिंडीत विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठला हरी ओम विठ्ठला, रामकृष्ण हरी, विठुरायाच्या नामघोषात अवघा महाराष्ट्रच नव्हे तर अवघा आसमंत दणाणून निघाला. पुढे हा सोहळा गणराज नगर , शिवराज नगर, गोडबोले प्लॉट येथून 12 वाजता प्रस्थान होऊन पायीदिंडी ही संगम चौक, सुवर्ण गणेश मंदिर, दत्त मंदिर येथून आरास ले आऊट राठोड हॉस्पिटल मार्गस्थ होऊन परत गजानन महाराज संस्थान येथे आगमन झाले. या दिंडी सोहळामध्ये परिसरातील भाविक भक्त.गण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गजानन महाराज संस्थान गोडबोले प्लॉट यांच्यावतीने आषाढी एकादशी निमित्त सकाळी 10 वाजता फराळाचे वाटप करण्यात आले.