केंद्र पुरस्कृत मनरेगा योजनेतील लाभार्थांच्या तक्रारींचा केल्या जाणार निपटारा ! केंद्रियमंत्री प्रतापराव जाधव

केंद्र पुरस्कृत मनरेगा योजनेतील लाभार्थांच्या तक्रारींचा केल्या जाणार निपटारा ! केंद्रियमंत्री प्रतापराव जाधव
* 20 जुलै पर्यंत शिवसेना तालुका प्रमुखांपर्यंत लेखी स्वरुपात तक्रारी दाखल करण्याचे आवाहन 
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        केंद्र पुरस्कृत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील लाभार्थांना येणाऱ्या समस्या व अडचणींचा निपटारा तात्काळ होऊन लाभार्थांपर्यंत या योजना सहज पोहचविण्याच्या दृष्टीकोनातुन केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव यांच्यावतीने तक्रार निवारण शिबीर घेण्यात येणार आहे. या योजनेसंदर्भात काही तक्रारी असल्यास त्या लेखी स्वरुपात शिवसेना तालुका प्रमुखांकडे सादर कराव्यात, असे आवाहन केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयातुन करण्यात आले आहे. 

      केंद्र सरकारच्या वतीने (मनरेगा ) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत येणारे विविध कामे प्रधानमंत्री आवास योजना, ( घरकुल ) सिंचन विहीर,  गोठा बांधकाम योजने लाभ पोहोचवण्याचं लाभार्थांच्या काही तक्रारी असल्यास त्या तक्रारीचा तात्काळ निपटारा करुन योजनेचा लाभ लाभार्थ्या पर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीकोनातुन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्यावतीने जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी व संबंधित विभागाच्या प्रमुखांच्या उपस्थितीत शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. ज्या नागरीकांच्या या योजनेसंदर्भात काही तक्रारी असतील त्या तक्रारी शिवसेनेच्या तालुका प्रमुखांकडे सविस्तर लेखी स्वरुपात स्वतःचे नाव व स्वत:चा मोबाईल नंबरसह सादर कराव्यात. 
        तालुक्यातील तक्रारी या संबधित तालुक्याचे शिवसेना तालुका प्रमुख यांच्याकडे सादर कराव्यात. शिवसेना तालुका प्रमुखांचे दुरध्वनी क्रमांक याप्रमाणे बुलढाणा तालुका प्रमुख धनंजय बारोटे 9527489480, मोताळा तालुका प्रमुख रामदास चौथनकर 9421945991, चिखली तालुका प्रमुख गजानन मोरे 8999253611, देऊळगांव राजा तालुका प्रमुख  अनिल चित्ते 9423048985, सिंदखेड राजा तालुका प्रमुख  वैभव देशमुख 9822954534, लोणार तालुका प्रमुख भगवान सुलताने 9850331021, मेहकर तालुका प्रमुख सुरेशतात्या वाळुकार 9890349999, खामगांव तालुका प्रमुख  राजेंद्र बघे 7020933105, शेगांव तालुका प्रमुख रामेश्वर थारकर 9922474386, जळगांव जामोद तालुका प्रमुख  अजय पारस्कार 9922144146, संग्रामपुर तालुका प्रमुख  केशवराव ढोकणे 9623333494, नांदुरा तालुका प्रमुख  सुनिल जुनारे 9850533260, मलकापुर तालुका प्रमुख  विजय साठे 8308378182 यांच्याकडे तसेच मेहकर येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालय आणि बुलढाणा येथील जिल्हाधिकारी येथील केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयात 20 जुलै पर्यंत आपल्या तक्रारी सादर कराव्यात, असे आवाहन केंद्रीय मंत्री तथा शिवसेना नेते प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.