बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतजमिनीची पाहणी ही केंद्रीय आयुष आरोग्य व कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे 28 जुनला शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करणार आहेत
26 जून रोजी बुलढाणा जिल्ह्यातील लोणार, मेहकर तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला या अतिवृष्टीमुळे शेतात पाणी तुंबुन शेतकऱ्यांच्या शेत जमिनी खरडून गेल्या आहेत अनेक शेतकऱ्यांचे नुकसान या अतिवृष्टीमुळे झाले आहे शेतकऱ्यांच्या बंधावर जावुन नुकसानीची पाहणी करण्यासाठी 28 जुनला केंद्रीय मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव हे लोणार, मेहकर या अतिवृष्टी ग्रस्त भागांचा दौरा करणार आहेत. सकाळी 10 वाजता लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथून आपल्या दौऱ्याला सुरुवात करणार आहे. अंजनी , शारा , वेणी गुंधा , त्यानंतर मेहकर तालुक्यातील अंत्री देशमुख , डोणगाव , गोहेगाव ,पांगरखेड ,जनुना शेलगाव देशमुख ,विश्वी , घाटबोरी या भागात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केद्रीयमंत्री प्रतापराव जाधव शेतकऱ्यांच्या बांधावर जावून करणार आहेत.