* शेतकऱ्याबद्दलच्या संतापजनक वक्त्यव्याचा घेतला समाचार
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
भरसभेत शेतकऱ्याबद्दल बोलतांना जीभ घसरलेल्या परतूरचे आमदार बबनराव लोणीकर यांना जनताच धडा शिकवेल, अशी प्रतिक्रिया शिवसेना( उबाठा) प्रवक्ता जयश्रीताई शेळके यांनी व्यक्त केली आहे.
तुझ्या बापाला पेरणीला पैसे मोदींनी दिले. तुझ्या माय, बापाचा पगार मीच दिला. तुझ्या पत्नी, माय, बहिणीच्या खात्यात लाडक्या बहिणीचे पैसे आमच्या सरकारमुळे येतात. तुझ्या अंगावरचे कपडे अन हातातील मोबाईल आमच्यामुळे आला आहे. आमचेच खातो अन आमच्यावरच तंगडे वर करतो, असे संतापजनक वक्तव्य आ.बबनराव लोणीकर यांनी केले होते. याबाबत राज्यभरातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शिवसेना प्रवक्ता जयश्रीताई शेळके यांनी सुद्धा सोशल मिडियावरून लोणीकरांच्या वक्तव्याचा शिवसेना स्टाईल समाचार घेतला. "तुम्हाला जनतेच्या पैशातून सुविधा मिळतात. तुमचे सरकार सुद्धा जनतेच्या पैशावर चालते. त्यामुळे तुमचे जनतेवर नाही तर जनतेचे तुमच्यावर उपकार आहेत. आता जनताच तुम्हाला धडा शिकवेल, असे त्यांनी म्हटले आहे.