केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावुन केली नुकसानीची पाहणी* शेतकऱ्यांना दिला आधार* अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतजमिनीचे पंचनामे करण्याचे दिले निर्देश

केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावुन केली नुकसानीची पाहणी
* शेतकऱ्यांना दिला आधार
* अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतजमिनीचे पंचनामे करण्याचे दिले निर्देश 
बुलढाणा :  (एशिया मंच न्युज)
       अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतजमिनीची पाहणी आज केंद्रीय आयुष आरोग्य व कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली शेतकऱ्यांना आधार देत नुकसानीचे तात्काळ जमिनीचे पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला दिलेत.


         26 जून रोजी बुलढाणा जिल्ह्यातील लोणार आणि मेहकर तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला या अतिवृष्टीमुळे शेतात पाणी तुंबुन शेतकऱ्यांच्या शेत जमिनी खरडून गेल्या होत्या अनेक शेतकऱ्यांचे नुकसान या अतिवृष्टीमुळे झाले आहे शेतकऱ्यांच्या बंधावर जावुन नुकसानीची पाहणी आज 28 जुनला केंद्रीयमंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केली बुलढाणा जिल्ह्यातील
लोणार आणि मेहकर तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा आज त्यांनी केला लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथून त्यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली अंजनी , शारा , वेणी गुंधा , त्यानंतर मेहकर तालुक्यातील अंत्री देशमुख , डोणगाव , गोहेगाव ,पांगरखेड ,जनुना शेलगाव देशमुख ,विश्वी , आणि घाटबोरी या भागात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केद्रीयमंत्री प्रतापराव जाधव शेतकऱ्यांच्या बांधावर जावून केली शेतकऱ्यांसोबत संवाद साधुन त्यांना आधार दिला शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई कशी मिळेल या दृष्टिकोनातून राज्य सरकारकडे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले . सोबतच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना दिले यावेळी त्याच्या सोबत माजी आमदार संजय रायमुलकर , जिल्हा प्रमुख बळिराम मापारी तालुका प्रमुख तात्या वाळुकर भागवत सुलताने पाटील तहसील आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.