आदिवासीचा न्याय व हक्कासाठी जन आक्रोश मोर्चा
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी गुरुवारी दिनांक 27 जून 2025 रोजी बुलढाणा येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मागिल 12 दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माळेगाव येथील आदिवासी बांधव उपोषणाला बसले होते. आम्रपाल वाघमारे यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या उपोषणाचे प्रमुख मार्गदर्शक आदिवासी विकास परिषदेच्या नंदिनीताई टारपे, नरहरीदादा गवई, एकलव्य संघटनेचे विदर्भ अध्यक्ष राजेंद्र मोरे, आशिषबाबा खरात होते. या आंदोलनाला समर्थन म्हणून 27 जून रोजी भिलवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत शहरात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पवनराजे सोनवणे, महिला प्रदेशाध्यक्ष नंदिनी टारपे, अम्रपाल वाघमारे, आशिष बाबा खरात, मधुकर पवार, कुणाल पैठणकर, दिलीप मोरे यांनी मार्गदर्शन केले.
माळेगाव येथील आदिवासी बांधवांवर केलेल्या अत्याचाराचा निषेध व्यक्त करून आदिवासी बांधवांचे वन विभागाने उध्दवस्त केलेली घरे त्याच ठिकाणी बांधून देण्यात यावी, आदिवासी जातीचे प्रमाणपत्र दाव्यात दाखल असतांना गैरआदिवासी म्हणणाऱ्या अधिकाऱ्यावर तत्काळ ॲट्रासिटी गुन्हा दाखल करावा, आदिवासी बांधवांच्या शेतीमध्ये वन विभागाने पाडलेली घरे पूर्ववत करुन शेती वहीतीलायक करुन द्यावी, माळेगाव येथील जि. प. शाळा इतरत्र हलविण्यात येऊ नये, अंगणवाडी पूर्ववत चालू करण्यात यावी, बुलढाणा शहराच्या विविध भागातील आदिवासी / बहुजन समाजाचे राहती जागा नावे करुन नमुना ८ अ तत्काळ देण्यात यावे, मोहेगाव येथील ग्रामस्तरीय समीतीकडे प्रलंबीत असलेली दाव्यानुसार मशागतीची परवानगी तत्काळ देण्यात यावी, घटनेतील अनुच्छेद २१ चे उल्लंघन करणाऱ्या व घरावर बुल्डोजर फिरविणाऱ्या मोताळा आरएफओवर तत्काळ निलंबन करण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले .
यावेळी आंबेडकरवादी नेते आशिष बाबा खरात, आम्रपाल वाघमारे व आदिवासी विकास परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष नंदिनीताई टारपे, मित्रवर्य सिद्धांत भाई वानखडे मोर्च्याचे नेतृत्व एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पवन राजे सोनवणे, उपाध्यक्ष बाळासाहेब बरडे, गुलाबराव ठाकरे, माजी नगरसेवक कैलास माळी, एकनाथ बरडे, विजय मोरे, संतोष मोरे, मधुकर पवार, दिलीप मोरे, आशिष बाबा खरात,अरुण बरडे, परिषदेचे जिल्हाध्यक्ष सोपान सोळंके, कुणाल पैठणकर ,राहुल बरडे,बाळू ढंगारी, प्रदेश उपाध्यक्ष बोरडे, अरुण बरडे, विकी गायकवाड, संदीप पिंपळे उमेश बरडे, सपना गायकवाड, ममताबाई ठाकरे, मंगला पवार, किशोर ठाकरे, लखन ठाकरे उपस्थित होते. यावेळी आदिवासी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते.