सलग दुसऱ्या दिवशी केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव करणार दुष्काळग्रस्त भागाच्या दौरा ! * बांधावर जाऊन देणार शेतकऱ्यांना आधार

सलग दुसऱ्या दिवशी केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव करणार दुष्काळग्रस्त भागाच्या दौरा ! 
* बांधावर जाऊन देणार शेतकऱ्यांना आधार 
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
         शेती आणि शेतकरी यांच्या सोबत जिव्हाळ्याचं नातं असलेले केंद्रीयमंत्री भुमिपुत्र प्रतापराव जाधव हे सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टीने बाधित झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना आधार देणार आहेत.

       26 जून रोजी बुलढाणा जिल्ह्यातील लोणार आणि मेहकर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने या दोन्ही तालुक्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले जमिनी खरडून गेल्यात या संदर्भाची माहिती मिळाल्यानंतर केंद्रीय मंत्री भूमिपुत्र प्रतापराव जाधव हे 27 ला दिल्लीवरून आल्यानंतर 28 जून रोजी त्यांनी लोणार आणि मेहकर तालुक्यातील तालुक्याचा दौरा केला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांसोबत संवाद साधून त्यांना धीर दिला . शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली व प्रशासनालाही तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले सलग दुसऱ्या दिवशी उद्या 29 जूनला मेहकर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत.
सकाळी 10 वाजता केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हे मेहकर तालुक्यातील फर्दापुर गावापासुन ते आपल्या दौऱ्याला सुरुवात करणार आहे . त्यांच्यासोबत माजी आमदार संजय रायमुलकर, शिवसेनेचे पदाधिकारी आणि प्रशासनातील अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
सकाळी 10.30 वा.  कंबरखेड ता.मेहकर येथे आगमन व अतिवृष्टी, नुकसानग्रस्त भागांची पाहणी,
सकाळी 11.00 वा. गौंढाळा ता.मेहकर येथे आगमन व अतिवृष्टी, नुकसानग्रस्त भागांची पाहणी,
सकाळी 11.30 वा.  भालेगांव ता.मेहकर येथे आगमन व अतिवृष्टी, नुकसानग्रस्त भागांची पाहणी,
दुपारी 12.00 वा.   पाचला ता.मेहकर येथे आगमन व अतिवृष्टी, नुकसानग्रस्त भागांची पाहणी,
दुपारी 12.30 वा. :- रायपुर ता.मेहकर येथे आगमन व अतिवृष्टी, नुकसानग्रस्त भागांची पाहणी, 
दुपारी 01.00 वा. सावत्रा ता.मेहकर येथे आगमन व अतिवृष्टी, नुकसानग्रस्त भागांची पाहणी,  दुपारी 01.30 वा. :- नायगांव दत्तापुर ता.मेहकर येथे आगमन व अतिवृष्टी, नुकसानग्रस्त भागांची पाहणी करणार असून
दुपारी 02.00 वा. मोसंबेवाडी ता.मेहकर येथे आगमन व अतिवृष्टी, नुकसानग्रस्त भागांची पाहणी, 
दुपारी 02.30 वा.  जानेफळ ता.मेहकर येथे आगमन व अतिवृष्टी, नुकसानग्रस्त भागांची पाहणी, 
दुपारी 03.00 वा.  उटी ता.मेहकर येथे आगमन व अतिवृष्टी, नुकसानग्रस्त भागांची पाहणी, दुपारी 03.30 वा. :- वरवंड ता.मेहकर येथे आगमन व अतिवृष्टी, नुकसानग्रस्त भागांची पाहणी, दुपारी 04.00 वा. देऊळगांव साकर्षा ता.मेहकर येथे आगमन व अतिवृष्टी, नुकसानग्रस्त भागांची पाहणी,  त्यांनतर सोयीनुसार "मातोश्री" शिवाजी नगर मेहकरकडे प्रस्थान करणार आहे.