आगामी निवडणूकांमधील अप्रत्यक्ष राजकीय हस्तक्षेप थांबावा : ॲड.जयश्रीताई शेळके

आगामी निवडणूकांमधील अप्रत्यक्ष राजकीय हस्तक्षेप थांबावा : ॲड.जयश्रीताई शेळके
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
         लोकशाही व्यवस्था टिकवण्यासाठी निवडणुका केवळ प्रक्रियाच नव्हे, तर एक जबाबदारी आहे. त्यामुळे प्रशासन आणि निवडणूक यंत्रणेने कोणताही पक्षपात न करता संपूर्ण प्रक्रियेला पारदर्शक, विश्वासार्ह आणि निःपक्ष ठेवावे, ही नागरिकांची रास्त व न्याय अपेक्षा आहे. त्याअनुषंगाने बुलडाणा जिल्ह्यातील स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नि:पक्षपातीपणे आणि नियमानुसार क्षेत्र रचना व्हावी. तसेच बुलडाणा नगर परिषद हद्दीत प्रशासनातील अप्रत्यक्ष राजकीय हस्तक्षेप टाळण्याची मागणी आज महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे 24 जून रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली.

       दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, आगामी काळात बुलडाणा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील नगर परिषद, तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती, वॉर्ड व क्षेत्र रचनेची प्रक्रिया सुरू होण्याच्या तयारीत आहे. यावेळी ही रचना कोणत्याही राजकीय दबावाशिवाय, पूर्णतः तांत्रिकदृष्ट्या व नियमांनुसार पार पाडली जावी, अशी नागरिकांची जोरदार मागणी आहे. यामध्ये नि:पक्षता, जनसंख्येचे समतोल प्रमाण, भौगोलिक सुसंगती आणि घटक भागांची वास्तविकता या बाबींचा प्रामाणिक विचार होणे गरजेचे आहे. अन्यथा वॉर्ड व क्षेत्र रचना ही सत्ताधारी पक्षांच्या फायद्यासाठी व निवडणुकीतील समीकरणांना डोळ्यासमोर ठेवून होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

        बुलडाणा नगर परिषद हद्दीत सध्या काही प्रशासनिक अधिकारी सत्ताधारी पक्षाला सोयीची भूमिका घेऊन निर्णय घेत असल्याचे नागरिकांचे निरीक्षण आहे. अशा प्रकारचा हस्तक्षेप निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो. यामुळे प्रशासनातील निर्णयप्रक्रियेत पारदर्शकता राहात नाही. मात्र निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता आणि लोकशाही मूल्यांची पूर्तता होणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे प्रशासनातील कोणत्याही अधिकाऱ्याने कोणत्याही पक्षाच्या प्रभावाखाली काम करू नये, असे आढळून आल्यास त्यांची तात्काळ चौकशी व्हावी, गरज असल्यास कार्यवाही केली जावी, अशी ठाम मागणी महाविकास आघाडीच्यावतीने  जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.                 
    यावेळी मेहकर विधानसभा मतदार संघाचे आ. सिद्धार्थ खरात, माजी आ. राहुलभाऊ बोंद्रे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव डॉ.स्वातीताई वाकेकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रसेनजितजी पाटील, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पश्चिम विदर्भ अध्यक्ष डॉ. ज्योतीताई खेडेकर, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने, बुलढाणा जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रकाशराव पाटील, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हाप्रमुख आशिषभाऊ रहाटे, राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष विश्वासराव पाटील, माजी उपाध्यक्ष संगीतराव भोंगळ, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष नरेशभाऊ शेळके, युवासेना जिल्हाध्यक्ष नंदू कऱ्हाडे, समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष नफीजभाई, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस अतुल लोखंडे, सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील, माजी नगराध्यक्ष गजानन वाघ, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अतुलदादा पाटील, बुलढाणा शहर कांग्रेसचे अध्यक्ष दत्ताभाऊ काकस, माजी न.पा. उपाध्यक्ष विनोद बेंडवाल, काँग्रेस आदिवासी सेलचे अध्यक्ष विजय मोरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनिल तायडे, शहर काँग्रेस उपाध्यक्ष कांता चव्हाण, शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाप्रमुख सोफियानभाई, बबलू कुरेशी, जाकीर कुरेशी, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक संदीप इंगळे, देऊळघाट सरपंच शेख गजनफर, रफिकभाई, युवासेना शहरप्रमुख अनिकेत गवळी, दत्ताभाऊ डिवरे मुश्ताक शेख, रोहित गवई, अनिल वारे, मोसिन खान आदी उपस्थ‍ित होते.