बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
येथील भारत विद्यालय लगत असलेल्या रस्त्याच्या दुतर्फा घाणीची साफसफाई करण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी बुलढाणा शहर अध्यक्ष मिलिंद वानखडे यांनी मुख्याधिकारी नगर परिषद बुलढाणा यांना 23 जून रोजी देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे दुर्गंध येत आहे, सदर रस्त्यावरून शालेय विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात ये-जा असते. या रस्त्यावरून मुलांना व नागरिकांना येतांना, जातांना अक्षरशः तोंडाला रुमाल किंवा हाताने तोंड, नाक बंद करून पुढे जावे लागते किंबहुना विद्यार्थी आजारी पडण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. सदर रस्त्याची सुद्धा दुरावस्था झालेली आहे.
शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा असलेल्या रस्त्या लगतची घाण त्वरित प्रशासनाने स्वच्छ करावी, असेही निवेदनात नमूद आहे.
निवेदन देतेवेळी शहर महासचिव दिलीप राजभोज, विजय राऊत, संघटक अब्दुल हमीद, सम्यक विद्यार्थी आंदोलन बुलढाणा शहर अध्यक्ष अब्दुल नवेद, सचिन वानखेडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.