* समाजात तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्याचा निषेध
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
बुलढाणा येथील मुस्लीम वेल्फेअर असोसिएशनने समाजात सलोखा आणि शांतता टिकवण्यासाठी एक सकारात्मक पाऊल उचलले आहे. असोसिएशनने अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांच्या एका वादग्रस्त वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध करत, अशा विधानांमुळे समाजात तेढ निर्माण होऊ नये, असे मुस्लिम वेल्फेअर असोसिएशन बुलढाणा यांनी जिल्हाधिकारी यांना 23 जून रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे केले आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, आमदार जगताप यांनी कथितरित्या केलेल्या "जहा आयेगा लांडा, वहा आयेगा डांडा, जहा आयेगा अली, वहा आयेगा बजरंगबली" या वक्तव्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. मात्र, मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनने या घटनेकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, अशा प्रकारची वक्तव्ये समाजाला विभाजित करतात आणि सलोखा बिघडवतात. यामुळे, संविधानाच्या मूल्यांचे आणि सामाजिक सलोख्याचे रक्षण करण्यासाठी योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या निवेदनाद्वारे असोसिएशनने केवळ निषेध नोंदवला नाही, तर भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आणि समाजात एकता टिकवून ठेवण्यासाठी योग्य पावले उचलण्याची गरजही अधोरेखित केली आहे. संबंधितावर कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा देखील दिला आहे, ज्यामुळे प्रशासनाला या गंभीर विषयावर लक्ष देण्यास भाग पाडता येईल. समाजात शांतता राखण्यासाठी ते प्रयत्नशील राहतील.
यावेळी सैय्यद इक्बाल (जिल्हाध्यक्ष, मुस्लीम वेल्फेअर असोसिएशन, बुलढाणा) यांच्या नेतृत्वाखाली मोहम्मद सोफीयान अब्दुल रब्बानी, शेख रफिक शेख करीम, शेख सादीक पत्रकार, महमद आबीद अब्दुल गफ्फार, सैय्यद इसमाइल, शेख जुनेद, यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात हे निवेदन सादर केले. मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनने या निवेदनाद्वारे समाजात सलोखा टिकवण्याचा आणि शांततेचे वातावरण निर्माण करण्याचा संदेश दिला आहे.