शाळा हेच संस्कारांचे मंदिर - ॲड.जयश्रीताई शेळके* गणवेश-साहित्य वाटपाने शाळेची रंगत वाढली ; शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

शाळा हेच संस्कारांचे मंदिर - ॲड.जयश्रीताई शेळके
* गणवेश-साहित्य वाटपाने शाळेची रंगत वाढली ; शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

मोताळा : (एशिया मंच न्युज)
        नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होताच विद्यार्थ्यांमध्ये नवा उत्साह, नव्या स्वप्नांची बीजं रोवली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर जहांगिरपूर (ता. मोताळा) येथील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे उत्साहवर्धक स्वागत करण्यात आले. तसेच शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) प्रवक्ता ॲड.जयश्रीताई शेळके यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व आवश्यक शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. लहानग्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद पाहून उपस्थित मान्यवरांच्या चेहऱ्यावरही समाधानाचे हास्य झळकले. गावातील नागरिक, पालक, शिक्षक, आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विद्यार्थ्यांच्या उत्साहात भर घातली.

           जिल्हा परिषद उर्दु प्राथमिक शाळेला गावातील शेख सुपडू शेख आलम, फिरोज खान, युनूस खान, शेख अमीन, उस्मान शहा यांच्यावतीने स्वतःच्या मालकीची जागा शालेय उपयोगासाठी देण्यात आली. तसेच शेख रहिम, शेख सईद यांनी स्वखर्चाने विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले. त्याअनुषंगाने उपरोक्त सर्वांचा शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने सत्कार करण्यात आला.
        जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा येथे ॲड.जयश्रीताई शेळके यांनी भेट देऊन शालेय साहित्य व खाऊ वाटप केले. यावेळी कार्यक्रमाला गटशिक्षण अधिकारी धंदर , पंचायत समितीचे माजी उपसभापती युनूसशेठ, शिवसेना तालुकाप्रमुख विजय इंगळे, सरपंच प्रभाकर इंगळे, उपसरपंच जयचंद्र चोपडे, तंटामुक्ती अध्यक्ष रहिम ठेकेदार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शेख सईद, समाधान राऊत, ग्राम पंचायत सदस्य शेख खलिल ठेकेदार, जयंत चोपडे, रेखाताई इंगळे, विजय चव्हाण, शेख अन्वर, मौलाना युसुफ, केंद्र प्रमुख नंदिनी पवार, जि.प.उर्दू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक जुनेद सर, सहाय्यक शिक्षक नसीम सर, जि.प.मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र वाघ, सहाय्यक शिक्षक सुनिल वाघ यांची उपस्थिती होती.