मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मनसे देत आहे शाळांना पत्र* मुख्याध्यापकांनो, हिंदी भाषा सक्तीच्या राजकारणाला बळी पडू नका : अमोल रिंढे पाटील

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मनसे देत आहे शाळांना पत्र
* मुख्याध्यापकांनो, हिंदी भाषा सक्तीच्या राजकारणाला बळी पडू नका : अमोल रिंढे पाटील
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
        महाराष्ट्रात हिंदी भाषा लादण्याच्या संदर्भात प्रचंड असंतोष आहे. मुलांवर भाषा लादण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, तो हाणून पाडला पाहिजे. यात मुलांचे नुकसान आहे. पण त्यासोबतच मराठी भाषेचे सर्वात जास्त नुकसान आहे.       मुख्याध्यापकांनो, हिंदी भाषा सक्तीच्या राजकारणाला तुम्ही बळी पडू नका, असे आवाहन बुलढाणा मनसे तालुकाध्यक्ष अमोल रिंढे पाटील यांनी सोमवार 23 जून रोजी तांदुळवाडी, कोलवड, नांद्राकोळी, सागवन येथील शाळांना भेटी देऊन केले आहे.

     अमोल रिंढे पाटील यांनी मनसेच्या वतीने शाळांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, उद्या ती मुलं मोठी झाल्यावर त्यांच्या गरजेनुसार त्यांना हवी ती भाषा ते शिकू शकतात. पण आतापासून हे ओझे त्यांच्यावर कशाला? तुम्ही ठाम राहिलात आणि सरकारचे मनसुबे उधळून लावलात तर आम्ही तुमच्या मागे पहाडासारखे उभे राहू. पण तुम्ही स्वेच्छेने सरकारच्या छुप्या हेतूंना मदत करुन महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर असे ओझे लादणार असाल आणि अशी भाषा लादणार असाल, जी शिकली काय नाही शिकली काय फरक पडत नाही, तर मग माझे महाराष्ट्र सैनिक तुमच्याकडे चर्चेला येतील. तुम्ही ठाम राहिलात आणि सरकारचे मनसुबे उधळून लावलात तर आम्ही तुमच्या मागे पहाडासारखे उभे राहू, असेही आश्वासनही अमोल रिंढे पाटील यांनी मुख्याध्यापकांना दिले आहे.

* तालुक्यातील शाळा पिंजून काढणार : अमोल रिंढे पाटील

       मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मनसे पक्षाने कायमच आक्रमक भूमिका घेतली आहे. राज ठाकरे साहेबांनी मुख्याध्यापकांना लिहिलेले पत्र घेऊन शाळांमध्ये भेटी देत आहे. मुख्याध्यापकांशी चर्चा करून मराठी भाषेचे महत्व पटवून देत असल्याचे बुलढाणा मनसे तालुकाध्यक्ष अमोल रिंढे पाटील यांनी सांगितले. आगामी दहा दिवसांमध्ये तालुकातील सर्व शाळा पिंजून काढणार असून हिंदी सक्ती विरोधात मनसे जनजागृती करणार असल्याचे ते म्हणाले.