बैलगाडीचे स्वतः स्वरर्थ करत केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी विद्यार्थ्यांना आणलं पहिल्या दिवशी शाळेत

बैलगाडीचे स्वतः स्वरर्थ करत केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी विद्यार्थ्यांना आणलं पहिल्या दिवशी शाळेत
बुलडाणा : (एशिया मंच न्युज)
       पहील्या दिवशी 
शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना बैलगाडीतून बसून त्यांच स्वतःह स्वरर्थ करत केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी शाळेत आणलं शाळेत आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देत त्यांचं स्वागत केले.

       दोन महिन्याच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर विदर्भातील शाळेची पहिली घंटा आज 23 जूनला वाजली शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्वागत केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी मादणी येथील जिल्हा परिषद शाळेत जाऊन शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाला हजेरी लावली. विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. प्रवेशोत्सव गावातून  वाजत गाजत करण्यात आली. बैलगाडीतून विद्यार्थ्यांना घेऊन त्यांचे स्वरर्थ स्वतःह केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.  शाळेत झालेल्या प्रवेशोत्सव कार्यक्रमात विद्यार्थ्यांना अद्यावत स्कूल बॅग आणि शालेय गणवेश विद्यार्थ्यांना देण्यात आले. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या पुढाकारातून बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या जवळपास 17000 विद्यार्थ्यांना या अद्यावत स्कूल बॅग वाटप करण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ आज जिल्हा परिषदेच्या मादणी शाळेपासून करण्यात आला. शिक्षणाविषयी विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण व्हावी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुद्धा चांगल्या दर्जेदार शैक्षणिक साहित्य मिळावे, हेतुने ग्रामीण भागात शिक्षण घेणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी या स्कूल बॅग वाटप करण्यात येत आहे.  

 * ज्या शाळेत शिकलो, त्या शाळेतील विद्यार्थ्यांचे स्वागत : 
       आज प्रवेशोत्सवच्या निमित्याने करण्याचा भाग्य मला मिळाले. जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना अद्यावत स्कुल बॅग देण्याच शुभारंभ आज मादणी गावातून सुरु केला आहे, अशी प्रतिक्रिया माध्यमांसमोर बोलताना केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली.