सचिन पिंगळे 'विशवकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार' ने सन्मानित
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने देण्यात येणारा विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार 2023 सचिन लक्ष्मण पिंगळे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, विभागीय कार्यालय, बुलढाणा यांना प्रदान करण्यात आला आहे.
कामगारांच्या मेहनतीमुळेच महाराष्ट्राचा विकास शक्य झाला आहे. ’विकसित महाराष्ट्र 2047’ च्या दिशेने वाटचाल करीत असताना आणि एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचा ध्यास घेतलेला असताना या स्वप्नपूर्तीत कामगारांचा वाटा केवळ गरजेचा नाही तर अनिवार्य आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने हुतात्मा बाबू गेनू स्टेडियम, कामगार क्रीडा भवन, प्रभादेवी येथे आयोजित कार्यक्रमात 36 व्या कामगार भूषण पुरस्कार व विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारांचे वितरण राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कामगार मंत्री अॅड. आकाश फुंडकर, कामगार राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल, मनोज जामसुदकर, कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय.ए. कुंदन, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, कामगार आयुक्त डॉ.एच.पी. तुम्मोड, संचालक रोशनी कदम, कल्याण आयुक्त रविराज इळवे याच्यासह कामगार व त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.