छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात अभिवादन कार्यक्रम * केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव झाले सहभागी

छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात अभिवादन कार्यक्रम 
* केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव झाले सहभागी
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज)
        हिंदवी स्वराज्याचे धर्म रक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्य दिल्ली येथे आलेल्या रथ यात्रेत आणि महाराष्ट्र सदनात आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन कार्यक्रमात केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव ही सहभागी झाले होते. 

        छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून 9 मे रोजी नासिक येथून छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन चरित्र विशद करणारी एक रथयात्रा निघाली होती. ही रथयात्रा छत्रपती संभाजीनगर, जयपूर मार्गे प्रवास करत आज 14 मे रोजी दिल्ली येथे आली.  या रथयात्रेमध्ये महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून सुमारे 300 नागरिक सहभागी झाले होते. केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव ही या रथयात्रेमध्ये दिल्लीत सहभागी झाले त्यानंतर दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले . यानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करताना केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजांचे कार्य हे सर्वांनाच प्रेरणादायक आहे. त्यांचे शौर्य, बाणेदारपणा आणि आत्मबलिदान आम्ही कधीही विसरू शकणार नाही. दिल्ली येथील महाराष्ट्र साधनात झालेल्या छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवात महाराष्ट्रीयन नागरिक व महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.