शैक्षणिक गुणवत्तेसाठी पायाभूत सुविधा भक्कम करणार - आमदार धीरज लिंगाडे * अकोला येथे आयोजित शिक्षण परिषद व चर्चासत्रामध्ये साधला संवाद

शैक्षणिक गुणवत्तेसाठी पायाभूत सुविधा भक्कम करणार - आमदार धीरज लिंगाडे 
* अकोला येथे आयोजित शिक्षण परिषद व चर्चासत्रामध्ये साधला संवाद
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
        आजचे विद्यार्थी हेच खऱ्या अर्थाने उद्याचे भारताचे भविष्य आहे. ग्रामीण असो वा शहरी भाग यातून भारताचे भविष्य घडणार आहे. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता ही अधिक महत्त्वाची ठरते. याच शैक्षणिक गुणवत्तेसाठी पायाभूत सुविधा भक्कम असणे गरजेचे असून त्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे अमरावती पदवीधर मतदारसघाचे आमदार धीरज लिंगाडे यांनी सांगितले.
       अकोला येथे आयोजित शिक्षण परिषद व चर्चा सत्रामध्ये ते संवाद साधत होते. ३ मे 2025 रोजी अकोला शहरातील शिक्षण परिषद चर्चा सत्र आयोजन करण्यात आले. यावेळी अकोला शहरातील महानगर पालिका , जिल्हा परिषद, नगर परिषद शाळांच्या शिक्षक व विविध शिक्षण संघटना यांनी शिक्षण परिषद चर्चा सत्राचे आयोजन केले होते. यावेळी सुरुवातीला आमदार धिरज लिंगाडे यांचा सत्कार आयोजकांच्या वतीने करण्यात आला. यावेळी आमदार धीरज लिंगाडे यांनी महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिका शाळांचे दुरावस्थेबाबत चिंता व्यक्त केली. शासनाचे याकडे उदासीन धोरण असल्याने आपण विधिमंडळातही याबाबत आवाज उठवणार असल्याचे सांगितले. 

            यावेळी आश्वासित केले की, येणाऱ्या काळात पायाभूत सुविधांची दुरुस्ती करण्यासोबतच विविध शिक्षण साहित्य वाटप करून शाळेच्या प्रगतीला सहकार्य करण्याचे काम येणाऱ्या काळात करणार आहे. यावेळी आमदार साजिद खान पठाण, प्रकाश भाऊ तायडे ,डॉक्टर प्रशांत वानखडे, पंकज देशमुख सर, सुनील देशमुख सर , नदीम खान , शिवाजी देशमुख व इतर सर्व मान्यवर तसेच शहरातील शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.