भारतीय सैन्य दलाने केले"ऑपरेशन सिंदूर मोहीम फत्ते !” * शिवसेना प्रवक्त्या जयश्रीताई शेळकेंनी मानले भारतीय सैन्य दलाचा सार्थ अभिमान

भारतीय सैन्य दलाने केले
"ऑपरेशन सिंदूर मोहीम फत्ते !” * शिवसेना प्रवक्त्या जयश्रीताई शेळकेंनी मानले भारतीय सैन्य दलाचा सार्थ अभिमान  
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
        'ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून  पाकिस्तान विरुद्ध यशस्वी लष्करी कारवाई करणाऱ्या भारतीय सैन्य दलाचा भारतीय म्हणून आम्हाला सार्थ अभिमान आहे. 'ये तो अभी ट्रेलर है !'  'ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी लष्करी कारवाईसाठी भारतीय सैन्याचे मनापासून अभिनंदन अशा शब्दात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या प्रवक्त्या जयश्रीताई शेळके यांनी आज 7 मे रोजी आभार व्यक्त केले आहे.

भारतीय सेनेने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे 9 ठिकाण  उद्ध्वस्त करून ऑपरेशन सिंदूर ही मोहीम यशस्वी केली. भारतीय हवाई दलाने 6 मे रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या  सुमारास मध्यरात्री 1:28 वाजता ऑपरेशन सिंदूर सुरू होऊन 1:51 वाजता ते यशस्वीरित्या पूर्ण झाले. भारतीय सेनेच्या या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले होते. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सेनेने बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदचे हेडक्वार्टर उद्ध्वस्त केले आहे. दरम्यान या पाकिस्तान विरुद्ध यशस्वी लष्करी कारवाई करणाऱ्या भारतीय सैन्य दलाचे उबाठा शिवसेना गटाच्या प्रवक्त्या जयश्रीताई शेळके यांनी अभिनंदन करून आभार मानले आहे.