विधान परिषदेच्या विविध समित्यांवर आमदार लिंगाडे यांची नियुक्ती
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे अध्यक्ष प्रा. राम शिंदे यांनी परिषदेच्या विविध समित्यांवर सदस्यांची नियुक्ती केली आहे. अंदाज समिती, लोकलेखा समिती, पंचायत राज समिती, सार्वजनिक उपक्रम समिती इत्यादी सारख्या वचनबद्ध टीम तयार करण्यात आल्या आहेत. नामनिर्देशितांच्या यादीत विदर्भातील आ. धिरज लिंगाडे (काँग्रेस, अमरावती), यांचा समावेश करण्यात आला आहे. आ. धिरज लिंगाडे हे विशेष हक्क समिती, विमुक्त जाती, भटक्या जाती कल्याण समिती, व आमदार निवास व्यवस्था समिती, तसेच एड्स या रोगावर आळा घालण्यासाठी विधी मंडळ सदस्यांचा समावेश असलेल्या चर्चा पिठाची समिती, महाराष्ट्र विधान परिषदेच्या विविध समित्यांवर आ. धिरज लिंगाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आ. धिरज लिंगाडे हे महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री स्व. रामभाऊजी लिंगाडे यांचे पुत्र आहेत ज्याप्रमाणे आपल्या अभ्यासू कार्यशैली मुळे त्यांना ओळखले जाते. त्याचा फायदा निश्चितच ज्या समित्यावर ते काम करत आहे, त्या समितीला त्यांच्या अनुभवचा फायदा होईल.