पाणी हे अल्लाहने मानवासाठी दिलेले एक मोठे वरदान आहे* इतरांना वाटणे हे एक धार्मिक कार्य मानले जाते : उमेर देशमुख

पाणी हे अल्लाहने मानवासाठी दिलेले एक मोठे वरदान आहे
* इतरांना वाटणे हे एक धार्मिक कार्य मानले जाते : उमेर देशमुख 
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
        शहरातील गवळीपूरा येथील महम्मदी मस्जिद च्या अव्वामी बैतूल माल च्या वतीने वर्षातील 365 दिवस मदत कार्य सुरु असते. रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, गरीब गरजू, विधवांना दर महिन्याला घरपोच राशन किट गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शालेय साहित्य वाटप करण्यात येते. पवित्र रमजानच्या महीनाभर इफ्तार व सहरीच्या साहित्य वाटप करण्यात येते. 

       "दान करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे एखाद्याला पाणी देणे" लक्षात ठेवा, पाणी हे जीवन आहे परम करुणामय ईश्वराकडून मिळालेली देणगी आणि पाणी देणे हे इस्लाममध्ये एक उदात्त कार्य आहे. गरजूंची तहान भागवण्याची आणि अनंत बक्षिसे आणि आशीर्वाद मिळविण्याची ही संधी आहे. शोधूनही या पाणपोया सापडत नाहीत. त्यामुळे जमियत अहेले हदीस संयुक्त अव्वामी बैतूल माल च्या वतीने बुलडाणा बस स्टँड, चिखली स्टाप, बाजार लाईन, टिपू सुलतान चौकात शुद्ध मिनरल वॉटरची पाणपोई लावण्यात आली आहे.
           
* मिन्हाज खान अव्वामी बैतूल बुलडाणा
        उन्हाचा तडाखा दिवसभर जाणवत आहे. रस्त्यावर जाणाऱ्या अबालवृध्द महिला व वयस्कर व्यक्तींना तहान लागल्यास हाॅटेल व चहाच्या टपरीचा आधार घ्यावा लागत असे. त्यामुळे सामजिक बांधिलकीतुन नागरिकांना थंडगार पाणी मिळावे या हेतुने 'पाणपोई' सुरू केली आहे.