भारत मातेच्या रक्षणासाठी लढणाऱ्या सैनिकांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी 11 मे रोजी शिवसेनेच्या वतीने काढण्यात येणार तिरंगा रॅली * मेहकर येथील तिरंगा रॅलीत केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव होणार सहभागी

भारत मातेच्या रक्षणासाठी लढणाऱ्या सैनिकांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी 11 मे  रोजी शिवसेनेच्या वतीने काढण्यात येणार तिरंगा रॅली 
* मेहकर येथील तिरंगा रॅलीत केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव होणार सहभागी 
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
        भारत मातेच्या रक्षणासाठी
 देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी शिवसेना पक्षाच्यावतीने 11 मे रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रभर करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये नागरिकांसह शिवसैनिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेनेचे नेते तथा केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केल आहे .
          भारतातील जम्मू कश्मीर राज्यामध्ये पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर पहलगाम येथे 22 एप्रील रोजी पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्यामध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांना धडा शिकविण्याच्या  दृष्टीने तिन्ही सैन्य दलाला सूट दिली आणि भारतीय सैन्य दलाने सिंदूर ऑपरेशन राबविले यामध्ये अनेक दहशतवादी ठार झाले. दहशतवाद्यांना सदैव पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानने भारतावर हल्ला सुरु केला आहे. या हल्ल्याचा भारतीय सैनिक मोठ्या शुरतेने प्रत्युत्तर देत आहेत. देशाच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून भारत मातेचे रक्षण करणाऱ्या या शूर सैनिकांचं मनोधैर्य वाढविण्याच्या दृष्टिकोनातून संपूर्ण राज्यांमध्ये शिवसेनेच्या वतीने 11 मे रोजी तिरंगा रॅली काढण्याची आदेश शिवसेनेचे मुख्यनेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दिले आहेत. त्यानुसार संपूर्ण राज्यामध्ये तिरंगा रॅलीचे आयोजित करण्यात आले आहे. या तिरंगा रॅलीमध्ये देशभक्तीपर गीते , तिरंगाचा सन्मान आणि सैनिकांना मानवंदना देण्यात येणार आहे. या तिरंगा रॅलीमध्ये नागरिकांसह शिवसैनिकांनी सहभागी व्हावे आणि भारतीय सैनिकांचे मनोधैर्य वाढवावे, असे आवाहन शिवसेनेचे नेते तथा केंद्रीय आयुष आरोग्य व कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आहे 

 * मेहकर येथील तिरंगा रॅलीत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव होणार सहभागी

       बुलढाणा जिल्ह्यातील गावा गावत शहर आणि तालुक्याच्या ठिकाणी शिवसेनेच्यावतीने तिरंगा मोटरसायकल रॅली काढण्यत देणार आहे.  मेहकर येथे सकाळी 9 वाजता शासकीय विश्रामगृह येथून मोटरसायकल तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव माजी आमदार संजय रायमुलकर यांच्यासह नागरीक शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक सहभागी होणार आहेत.