मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनच्या बुलडाणा जिल्हा अध्यक्षपदी सैय्यद इकबाल सैय्यद अब्बास यांची निवड

मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनच्या बुलडाणा जिल्हा अध्यक्षपदी सैय्यद इकबाल सैय्यद अब्बास यांची निवड
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
       मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सलीम सारंग यांच्या हस्ते आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा उपाध्यक्ष बुलडाणा सैय्यद इकबाल सैय्यद अब्बास यांची मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनच्या बुलडाणा जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
संघटनेच्या कार्याचा विस्तार आणि उद्दिष्टांची प्रभावी अंमलबजावणी सैय्यद इकबाल सैय्यद अब्बास हे निश्चितच जोमाने करतील, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे.
     याप्रसंगी महेबुब शेख, अकरम तेली, रमीज शेख, रहेमान खान पठाण यांसह संघटनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.