केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांचा बुलढाणा जिल्हा दौरा

केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांचा बुलढाणा  जिल्हा दौरा
बुलढाणा  : (एशिया मंच न्युज)
       केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव मंत्री आयुष (स्वातंत्र प्रभार) आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री भारत सरकार यांचा आज २७ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजता मातोश्री शिवाजी नगर मेहकर येथून बुलढाणाकडे मोटारीने प्रस्थान करणार आहेत. ते सकाळी १०.३० वाजता स्थानिक बुलढाणा येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कार्यशाळेच्या मागे, कऱ्हाळे ले-आऊट येथे शिवसेना मुख्य नेते ना. एकनाथजी शिंदे यांच्या स्वागतासाठी हेलीपेंड येथे उपस्थित राहणार असुन पुढे ते जिजामाता प्रेक्षागार समोरील टिळक नाट्य मंदिर परिसरात शिवसेना मुख्य नेते ना. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आभार सभेस उपस्थिती राहणार आहे, असे त्यांचे खासगी स्वीयसहाय्यक गोपाल डिके यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.