विहिरीत ढकलून दिव्यांग युवकाचा खून

विहिरीत ढकलून दिव्यांग युवकाचा खून

चिखली : (एशिया मंच न्युज)
          पत्नीशी वाईट हेतूने बोलतो, अशा संशयावरून दिव्यांग युवकाला विहिरीत ढकलून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एका विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावातील दिव्यांग युवक वैभव पांडुरंग वाघमारे हा 23 एप्रिलच्या सकाळी 8:30 वाजतापासून गावातून गायब झाला होता. त्याचा सगळीकडे शोध घेतला असता तो मिळून आला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी गावातीलच लिंबाजी काशिनाथ झगरे यांच्या शेतातील विहिरीत वैभवचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी मृतक वैभव याचा भाऊ प्रसाद वाघमारे याने 25 एप्रिल रोजी रात्री 11:30 ला चिखली पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. तक्रारीत नमूद केले की, आरोपी अजय फत्तेसिंग सुरडकर याने वैभवला घरी बोलावून माझ्या पत्नीशी वाईट उद्देशाने का बोलतो असे म्हणत त्याला दमदाटी केली. 23 एप्रिल रोजी 11:30 ते 11:50 वाजे दरम्यान वैभव याच्या पाठीमागे जाऊन लिंबाजी काशिनाथ झगरे यांच्या शेतातील विहिरीत जीवे मारण्याचा उद्देशाने विहिरीत ढकलून दिले. त्यात त्याचा मृत्यू झाल्याचे नमूद आहे. या तक्रारीवरून आरोपी फत्तेसिंग सुरडकर विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास चिखली पोलीस करीत आहेत.
--------------------------