बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
नर्मदा पायी परिक्रमा करण्याची बऱ्याच भावीकांची इच्छा असते, परंतु परिक्रमा मार्ग, त्यात येणाऱ्या अडचणी, अनुभव, अनुभुती,या सर्व बाबतीत अनिभिज्ञ असल्यामुळे त्यांना परिक्रमा करणे अशक्य होते. यास्तव बुलडाणा शहरातील हरहुन्नरी कलाकार हरीभाऊ ठोसर, ह.भ.प. शिवाजी महाराज हे नुकतेच पायी परिक्रमा पूर्ण करून आले आहेत. त्यांचे परिक्रमेतील अनुभवांचे कथनाचा कार्यक्रम बुलढाणा अर्बन संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
नर्मदा पायी परिक्रमा करण्याला आध्यात्मिक क्षेत्रात खुप महत्व आहे. नर्मदा नदी अमरकंठ येथून उगम पाठवुन ती भरूच येथे समुद्राला मिळते. नर्मदा पायी परिक्रमा ही 3100 कि.मी ची असुन ती पुर्ण करण्यासाठी जवळपास 4 ते 5 महिने लागतात. बुलढाणा शहरातील हरहुन्नरी कलाकार हरिभाऊ ठोसर, ह.भ.प.शिवाजी महाराज काकडे यांनी सपत्नीक परिक्रमा पुर्ण केली आहे. त्यांचा अनुभव व अनुभूती ऐकण्याची आपली उत्सुकता पूर्ण करण्यासाठी रविवार 13 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता बुलडाणा अर्बन संस्थेच्या समोरील, गोवर्धन बिल्डिंग सभागृह या ठिकाणी यांच्या अनुभव कथानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला आपण वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन बुलडाणा अर्बन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष
राधेश्याम चांडक यांनी केले.