भगवान महावीर यांच्या जन्म कल्याणक महोत्सव निमित्याने फळ वाटप

भगवान महावीर यांच्या जन्म कल्याणक महोत्सव निमित्याने फळ वाटप 
देऊळगाव राजा : (एशिया मंच न्युज)
           श्री भगवान महावीर स्वामी यांच्या जन्म कल्याणक महोत्सव निमित्याने देऊळगावराजा शहरातल्या विविध गरीब वस्त्यांमध्ये  सकल जैन समाजातील युवकांनी फळ वाटप केले. अन्नदान करण्यामध्ये जैन समाज नेहमीच अग्रेसर असतो. सकल जैन समाजातील युवकांनी एकत्रीत येत नियोजन करीत आपण आपल्या परीने या मोलमजुरी करून उदर निर्वाह चालविणाऱ्या गोर गरीबांना फळांचे व अल्पोपहारचे वाटप करु असा निर्णय घेतला. सर्व साहित्य घेऊन ही युवक मंडळी थेट त्यांच्या राहुटी जवळ पोहोचले. यावेळी तेथील बच्चे कंपनीला या वस्तू वाटप केल्यानंतर  त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. यावेळी दीपक डोणगावकर,  राजेश खडकपूरकर, निलेश खंडारे, हेमंत जिंतूरकर, पिंकेश कोचाट, अभिषेक पूर्वत, श्रेयांस खवडे, कपिल डोणगावकर, हेमांशू कोचाट यांचा सहभाग होता. त्यांच्या या कार्याची दखल घेत भारतीय जैन संघटनेचे वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.