महात्मा फुले जयंती निमित्त दंत तपासणी शिबिर

महात्मा फुले जयंती निमित्त दंत तपासणी शिबिर
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
        स्थानिक महात्मा फुले इंग्लिश कॉन्व्हेंट येथे महात्मा फुले जयंती निमित्त 11 एप्रिल रोजी दंत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
       सदर दंत तपासणी शिबिर हे संस्थेचे संचालक इंजिनियर बाळासाहेब चौधरी यांच्या संकल्पनेतून घेण्यात आले. यावेळी ऍडव्हान्स डेंटल क्लिनिक यांच्या वतीने
दंतचिकित्सक डॉक्टर मुक्ता शेळके यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना दातांची कशी काळजी घेण्यावी यासंबंधी मोलाचे मार्गदर्शन केले करून  उपस्थित विद्यार्थ्यांची दातांची तपासणी केली. सोबतच त्यांना गरजेनुसार पुढील इलाज सांगितले. यावेळी दंत तपासणी शिबिराला शाळेचे प्राचार्य व शिक्षक वृंद यांनी सहकार्य केले.