केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिशा समितीच्या बैठकीत घेतला पिक विमा योजनेचा आढावा ! * पिक विम्याची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा

 केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिशा समितीच्या बैठकीत घेतला पिक विमा योजनेचा आढावा  ! 
* पिक विम्याची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा 


बुलढाणा  : (एशिया मंच न्युज)
        प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत सन 2023-24 च्या खरीप आणि रब्बीच्या हंगामातील 453 कोटी रुपयांपैकी 429 कोटी रुपयांचे वितरण शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. उर्वरित 24 कोटी रुपये तांत्रिक कारणामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नव्हते, त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे तर 2024 -25 हंगामातील पिक विम्याचे 144 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत तर उर्वरित निधी लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना आज 29 एप्रिल रोजी झालेल्या दिशा समितीच्या बैठकीत दिली.

          बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समितीच्या सभागृहात केंद्र पुरस्कृत योजनेचा आढावा केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आज 29 एप्रील रोजी घेण्यात आला. यावेळी प्रधानमंत्री पिक विमा योजनेची स्थिती मंत्री महोदयांनी जाणून घेतली,  त्यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे यांनी 2023- 24 वर्षात खरीप, रब्बी हंगामा अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील 4 लाख 50 हजार शेतकऱ्यांना 453 कोटी रुपयांचा पिक विमा रक्कम मंजूर झाला होता,  त्यातील 429 कोटी रुपयांचं वाटप करण्यात आला. उर्वरीत 24 कोटी रुपये शेतकऱ्यांचे खाते आधार लिंक व इतर कारणांमुळे जमा झाले नव्हते ते पैसेही आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. शिवाय सन 2024-25 खरीप हंगामात 144 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असून उर्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यात ही पिक पैसे जमा होणार आहे,  अशी माहिती ही यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे यांनी दिली.

* पांदन रस्त्यांचा पृथ्वी आराखडा तयार करा : केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे निर्देश 

      शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पीक मालांची वाहतूक करण्यासाठी महत्त्वपूर्ण करणारे पांदन रस्त्यांचं जाळ निर्माण होणे गरजेचे आहे.  सरकारच्या वतीने 45 हजार पांदण रस्ते विकसित करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत रस्त्यांचे कृती आराखडे तयार करा, असे निर्देश केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी या बैठकीत दिले.