* पत्रकार मित्रांनी दिलेला धीर मानसिक बळ देणारा ठरला - पत्रकार साबीर अली
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
एप्रील महिन्याच्या सुरुवातीलाच अर्थात ४ एप्रिल रोजी मलकापूर जवळ असलेल्या फार्मसी कॉलेज समोरून येणाऱ्या दुचाकीने जबर धडक दिल्याने बुलडाणा येथून मलकापूरकडे दुचाकीने येत असलेले दैनिक एशिया एक्स्प्रेस व मलकापूर आजतक चे पत्रकार साबीर अली गंभीर जखमी झाले होते. सदर अपघातात त्यांच्या डाव्या पायाला गंभीर दुःखापत झाल्याने त्यांना प्रथम मलकापूर व नंतर बऱ्हाणपूर येथे हलविण्यात आले.
येथील बोरले हॉस्पिटलचे संचालक तथा अर्थो सर्जन डॉ. सुबोध बोरले, सुप्रसिद्ध ज्वाइंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. स्वप्निल वाघ यांनी अथक परिश्रम घेत तब्बल सहा तास शस्त्रक्रिया केली. तद्नंतर २६ दिवस डॉक्टरांच्या देखरेखीत दिर्घ उपचार घेतल्यानंतर २८ एप्रिल रोजी त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यापूर्वी त्यांना भेटण्यासाठी व्हाइस ऑफ मीडिया, मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य लढा पत्रकार संघटनेचे पदाधिकारी सहीत विविध संघटनांनी रुग्णालयात येऊन भेट घेत प्रकृतीची आस्तेवाईकपणे विचारपूस करीत धीर दिला. यावेळी पत्रकार मित्रांनी दिलेला धीर मानसिक बळ देणारा ठरल्याचे सांगुन पत्रकार साबीर अली यांनी सर्वांचे आभार मानले.