यूपीएससी परीक्षेत 677 रँक घेऊन IPS झालेले नितीन बोडखे यांचा सत्कार

यूपीएससी परीक्षेत 677 रँक घेऊन IPS झालेले नितीन बोडखे यांचा सत्कार
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
          बुलढाणा अर्बन चे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी, बुलढाणा अर्बन संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर, बुलढाणा अर्बन चॅरिटेबल संस्थेच्या अध्यक्षा सौ.कोमलताई सुकेश झंवर यांच्या मार्गदर्शनातून बुलढाणा अर्बन संस्थेच्या धाड विभागाच्या वतीने शाखा वालसावंगी येथे नुकत्याच पार पडलेल्या पडलेल्या यूपीएससी परीक्षेत 677 रँक घेऊन IPS झालेले  नितीन अंबादास बोडखे यांचा शाखा वालसावंगी येथे सत्कार आला.
       यावेळी  स्थानिक संचालक गणेश पायघन, विजय गादिया, डॉ. वडगावकर, आत्माराम भुते, रमेश तराळ, सदाशिव आखाडे, शाळिग्राम पायघन, चेतन बाविस्कर, शाम राजपूत, धाड विभागीय व्यवस्थापक नितिन परदेशी , शाखा धाडचे शाखा व्यवस्थापक भरत इंगळे शाखा धावडाचे शाखा व्यवस्थापक सुरेश सिनकर, पिंपळगाव रेणुकाईचे शाखा व्यवस्थापक राजेंद्र भुसारी , पारधचे शाखा व्यवस्थापक विजय सिरसाट शाखा वालसावंगीचे शाखा व्यवस्थापक विठ्ठलसिंग ककोल्डे राजपूत ,अनिल कोथळकर यांच्यासह शाखा वालसावंगीचे कर्मचारी उपस्थित होते.