बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
भारत देशात हिंदू-मुस्लीम हे नेहमीच भाईचारा जोपासत गुण्यागोविंदाने राहत आहेत. परंतु काही विघ्नसंतोषी लोकांना हे पसंत नसल्यामुळेच पहलगाम सारखे दहशतवादी हल्ले करुन द्वेष पसरवित आहे. तरीही मुस्लीम समाजबांधवांनी आजही आपल्या भाईचाऱ्याचा सबुत देत बुलढाणा येथील जामा मस्जिद परिसरात पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आज २५ एप्रिल रोजी शुक्रवारची नमाज पढन करून काळी पट्टी बांधून निदर्शने करीत निषेध करण्यात आले.
यावेळी जामा मस्जिदचे इममा मंजूर अकबरी यांनी म्हटले की, पहलगाम येथे दहशतवाद्यांनी बेधुंद गोळीबार केला. यामध्ये निष्पाप नागरिकांना आपला जिव गमवावा लागला. त्यांच्या कुटूंबाला ईश्वर धिर देवो, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या हल्ल्याचा आम्ही निषेध करीत असुन केंद्र सरकारने या दहशतवाद्यांना कठोरात कठोर शिक्षा करावी, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी राईसोद्दिन काझी म्हणाले की, इस्लाम धर्म हा शांत आणि सयंम शिकवितो. माणसाला माणूसकीने, प्रमाने जिवण जगण्याचे संदेश देतो. ते पुढे बोलतांना म्हणाले की, कोणताही धर्म हा दहशतवादीचे शिक्षण देत नाही, असेही त्यांनी प्रसार माध्यमाशी बोलतांना सांगितले. पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या नागरिकांच्या दुःखात आम्ही त्यांच्या सोबत आहे. या भ्याड हल्ल्याचा आम्ही मुस्लीम बांधव शुक्रवारची नमाज पढन करुन काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त करीत आहेत. केंद्र सरकारने या दहशतवाद्यांचा कायमचा बंदोबस्त करून परत एकदा हिंदु-मुस्लीम बांधवांना भाईचाऱ्याचे दर्शन घडवून आनंदाने जगू द्यावे, अशी मागणीही त्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. यावेळी उपस्थित मुस्लिम बांधवांनी हिंदुस्तान जिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद अश्या घोषणा दिल्या.
यावेळी अॅड. राज शेख, मोहम्मद दानिश, सैय्यद जुनेद डोंगरे, डॉ. मोबीन खान, माजी नगर सेवक मोईन काझी, इरफान कुरेशी, मौलाना सलमान, रफिक कुरेशी यांच्यासह आदी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.