विविध मागण्यांसाठी एसटी कामगार सेनेचा उपोषणाचा इशारा

विविध मागण्यांसाठी एसटी कामगार सेनेचा उपोषणाचा इशारा
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
       विविध मागण्यांची तात्काळ पूर्तता करा अन्यथा एस.टी.विभाग नियंत्रक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा एस.टी.कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष गजानन माने यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी एका निवेदनाव्दारे दिला आहे.

       बुलढाणा विभागातील चालक, वाहक हे सहा.वाह.निरिक्षक, वाहतूक नियंत्रक परिक्षा पास झालेले आहे त्यांची रिक्त जागेवर पदोन्नती करावी, चिखली, बुलढाणा आगारात वाहकाकडून आलोकेशन केले जाते, मर्जीतील कामगारांना एकच एक कामगीरी दिली जाते व आतीकालीक भत्ता ही मर्जीतीलच कामगारांना दिला जातो त्यामुळे हा अन्याय थांबवावा, बुलढाणा आगारात चालक, वाहक यांच्यासाठी आरो प्लांटची सुविधा करावी, इतर विभागातून विनंती बदलीवर आलेल्या कामगारांना त्यांच्या जवळच्या आगारात नियुक्ती देण्यात यावी यासह आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. राज्यचिटणीस विजय पवार, विभागीय अध्यक्ष संदिप पाचपोर, विभागीय सचिव संजय उबरहंडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.