देऊळगाव राजा : (एशिया मंच न्युज)
शहरात वैद्यकीय क्षेत्रात अल्पावधीत नावारूपाला आलेले डॉक्टर उमेश मुंढे यांच्या मुंढे हॉस्पिटलला 19 एप्रिल च्या रात्री अचानक आग लागली होती. या आगीची माहिती हॉस्पिटलच्या वतीने नगरपरिषदला देण्यात आल्यानंतर अग्निशमनचा स्टाफ यांनी तात्काळ दखल घेत घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. होणारी हानी टाळण्यात आली. नगरपरिषद च्या अग्निशमनचा पथक व देऊळगाव राजा शहरातील विज वितरण कंपनीच्या संबंधित कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल मुंडे हॉस्पिटलचे डॉक्टर उमेश मुंढे, वायाळ हॉस्पिटलचे डॉक्टर वैभव वायाळ यांच्या वतीने अग्निशमन पथकातील भगवान मापारी, भाऊसाहेब साबळे, दत्ता मंडळकर, रऊफ भाई मिस्त्री यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी वैद्यकीय क्षेत्रातील अनेक नामवंत डॉक्टर उपस्थित होते. सोबतच नगरपरिषदचे विद्युत विभागाचे अभियंता प्रल्हाद मुंढे, न.प. प्रशासनाचे कार्यालय प्रमुख राजू जाधव, एमएसईबीचे अमोल माळोदे, राहुल माळोदे हे सुद्धा उपस्थित होते.