दुचाकी चोरटा पोलिसाच्या जाळ्यात* आरोपींकडून सात मोटार सायकल जप्त

दुचाकी चोरटा पोलिसाच्या जाळ्यात
* आरोपींकडून सात मोटार सायकल जप्त
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
        जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटनेत सततची वाढ ही चिंतेची बाब ठरली आहे. शहर व जिल्ह्यात चोरीच्या घटनेत वाढ पाहता यावर अंकुश यावा यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांनी दिलेल्या आदेशाने पोनि. स्थानिक गुन्हे शाखा सुनिल अंबुलकर, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवी राठोड यांच्या मार्गदर्शनात एक पथक तयार करून सदर पथकाने तपास चक्र फिरवित आरोपीला २४ तासात जेरबंद करून बेड्या ठोकल्या आहे.

          सदर घटनेची माहिती अशी की, गणेश चिकुवा वैद्य रा. कोलवड हे त्यांचे नातेवाईकाच्या उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय बुलडाणा येथे आले होते. दरम्यान त्यांनी त्यांची हिरोहोंडा कंम्पनीची स्पेंडर प्रो ही गाडी पार्कींग येथे पार्क करून हॉस्पीटलमध्ये गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांची मोटारसायकल लंपास केल्याची त्यांचे निदर्शनात आल्यानंतर त्यांनी शहर पोलीस येथे तक्रार दिली. या तक्रारीवरुन आरोपीवर अप.क्र.३६६/२०२५ क्र.३०३ (२) बीएनएस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

        सदर गुन्ह्याचा तपास मोठ्या शिताफीने करून आरोपी तेजस संजय पोकळे (वय २५ वर्षे) रा. रोहिणखेड याला २४ तासात जेरबंद करून अटक करीत आरोपीकडून मोटार सायकल जप्त करण्यात आली. पोलिसांनी खाकीचा दसका दाखवला असता आरोपीने जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली. आरोपी विरोधात वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. आरोपींकडून एकूण सात मोटारसायकल जप्त करण्यात आल्या असून यामध्ये हिरोहोंडा स्पेंडर (एमएच-२८-एसी-४७२६), बजाज डिस्कव्हर (एमएच-२८-एएफ-६६७३), सीडी १०० एसएस (एमएच-२८-एफ-०१५६), होंडा स्पेंडर (एमएच-२८-यू-३८६३), बजाज डिस्कव्हर (एमएच-२८-झेड-७६८२), टिव्हीएस विक्टोर (एमएच-२८-एम-२७२४), होंडा स्पेंडर (एमएच-२०-बीएच-२३१७) ह्या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.

       सदर कारवाई  सपोनि प्रताप भोस, भरत चपाईतकर, जयसिंग राजपूत, दिनेश मोरे, पोउपनि रवि मोरे, प्रोपोउपनि अश्विनी गाडे, माधूरी साळुंके सपोउपनि, नामदेव खवले, पोहेकॉ प्रकाश बाजड, संदिप कायंदे, पंजाबराव साखरे, सुनिल जाधव, पोकों मनोज सोनुने, योगेश लोखंडे, युवराज शिंदे, कौतीक बोर्डे, विनोद बोरे यांनी कामगिरी बजावली आहे.