चिखली विधानसभा मतदार संघातील भाजपा मंडळ अध्यक्ष पदाची नियुक्ती* समाजातील सर्व स्तरातील लोकांना प्रतिनिधित्व मिळाल्याने पक्षसंघटन अधिक मजबूत होईल : आमदार सौ. श्वेताताई महाले

चिखली विधानसभा मतदार संघातील भाजपा मंडळ अध्यक्ष पदाची नियुक्ती
* समाजातील सर्व स्तरातील लोकांना प्रतिनिधित्व मिळाल्याने पक्षसंघटन अधिक मजबूत होईल :  आमदार सौ. श्वेताताई महाले
 
चिखली : (एशिया मंच न्युज)
        विधानसभा निवडणूक संपल्यानंतर ऍक्टिव्ह मोडवर असलेल्या आमदार श्वेताताई महाले यांनी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून चिखली विधानसभा मतदारसंघातील चार मंडळासाठी, भाजपा मंडलाध्यक्ष या पदासाठी समाजातील सर्व स्तरातील योग्य व सर्वसामान्यांना आपलेसे वाटतील अशा लोकांना वाव मिळेल व त्यातून पक्ष व पक्षसंघटन आणि सर्वसामान्य कार्यकर्ते यांना आपलेसे वाटणारे नेतृत्व उभे राहील याची काळजी घेतल्याचे दिसून येत आहे. 

         आगामी ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुंबई येथे संपूर्ण महाराष्ट्रातील 1196 मंडळ अध्यक्ष यांची निवड जाहीर करण्यात आली. चिखली विधानसभा मतदार संघांमध्ये चिखली शहर, चिखली ग्रामीण, धाड आणि अमडापूर चे चार मंडळ येतात. यावर्षी अमडापूर हे नवीन मंडळ समाविष्ट करण्यात आले असून या भागातील अमडापूर उदयनगर व ईसोली येथील जनता व लोकसंख्येला योग्य प्रतिनिधित्व मिळावे म्हणून या नवीन मंडळाची निर्मिती आमदार श्वेताताई महाले यांच्या आग्रहानुसार करण्यात आली आहे.

      नुकतेच चिखली विधानसभा मतदार संघातील 99 गावांचे ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले असून ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सर्वात महत्त्वपूर्ण असलेल्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद या घटकांना मजबूत बनवून पक्ष संघटन अधिक सर्वसमावेशक व मजबूत बनवण्यासाठी समाजातील सर्व स्तरातील लोकांना सोबत घेऊन चालणारे आणि समाजातील सर्व जाती धर्माचे प्रतिनिधित्व करण्यास सक्षम असे मंडळ अध्यक्ष असावेत या आ. सौ. श्वेताताई महाले यांच्या सूचनेला मान देत चिखली विधानसभा मतदार संघातील चारही मंडळासाठी खालील प्रमाणे नियुक्ती जाहीर करण्यात आल्या आहेत.

        चिखली शहर या मंडळासाठी भाजपा युवा मोर्चाचे कार्य अतिशय तळमळीने करणारे व आपल्या संघटन कौशल्याने सर्वांना प्रभावित करणाऱ्या सागर पुरोहित यांची चिखली शहर मंडळाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्हा भाजपा मध्ये अतिशय सक्रिय सर्वांना सोबत घेऊन चालणारे आणि समाजातील सर्व स्तरातील लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी अतिशय सक्रिय असणारे डॉक्टर कृष्णकुमार सपकाळ यांची नियुक्ती चिखली ग्रामीण या मंडळाच्या मंडळ अध्यक्ष पदासाठी करण्यात आल्याचे वृत्त आहे. भाजपाचे तालुका सरचिटणीस असलेली व वैरागड उदयनगर, अमडापूर, ईसोली भागामध्ये भाजपा संघटन मजबूत करण्यासाठी मेहनत घेणारे अमोल साठे यांची नियुक्ती नवीनच झालेल्या अमडापूर मंडळासाठी मंडळ अध्यक्ष म्हणून करण्यात आली आहे. धाड या मंडळासाठी भाजपा मंडळ अध्यक्ष म्हणून अनिल जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

       समाजातील सर्व स्तरातील लोकांना सोबत घेऊन चालणारे व पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी मेहनत घेणारे, प्रत्येक मंडळातील जेष्ठ भाजपा पदाधिकारी, शक्तिकेंद्र प्रमुख, भाजपा कार्यकर्ते यांना सहज उपलब्ध होणाऱ्या व त्यांच्याच शिफारशी आधारे नियुक्त कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या देऊन सर्व सामाजिक स्तरांना एकत्र आणण्याचे पंतप्रधान यांचे प्रयत्न असल्याने हे नवनियुक्त मंडळाध्यक्ष पक्षाला अधिक खोलवर रुजन्यास मदत करतील, अशी अपेक्षा असून या सर्वांच्या नियुक्तीने पक्षाला बाळकटी मिळेल, असा अशावाद  आ. सौ. श्वेताताई महाले यांनी व्यक्त केला.