केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली मुंबई मंत्रालयातील उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षेला सदिच्छा भेट

केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली मुंबई मंत्रालयातील उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षेला सदिच्छा भेट
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
          शिवसेनेचे मुख्यनेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यामार्फत चालविल्या जाणाऱ्या मुंबई मंत्रालयातील उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षेला केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी सदिच्छा भेट दिली.

          राज्यातील जनतेला आरोग्यसेवा मिळावी या दृष्टिकोनातून शिवसेनेचे मुख्यनेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या माध्यमातून मुंबई मंत्रालय येथे उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे. केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे मुंबई दौऱ्यावर असतांना 16 एप्रील रोजी त्यांनी मंत्रालयातील उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षेला सदिच्छा भेट दिली. यावेळी उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी मदत कक्षेमार्फत होणाऱ्या रुग्णसेवेची आणि कांमाची माहिती दिली. मागील काळात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून हजारो रुग्णांना त्यांनी मदत केली.
        केंद्र सरकारच्या आरोग्य संदर्भात विविध योजना आहेत, त्या योजनेचा लाभ ही या कक्षेच्या माध्यमातुन रुग्णापर्यंत पोहचविल्या जातील असा विश्वास केद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केला. यावेळी प्रा.डॉ.सचिन जाधव, युवासेना सहसचिव महाराष्ट्र राज्य तथा जिल्हाप्रमुख ऋषी जाधव यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.