संग्रामपूर तालुक्यात परप्रांती मजुरांची घुसखोरी कोण थांबवणार?

संग्रामपूर तालुक्यात परप्रांती मजुरांची घुसखोरी कोण थांबवणार?
 टूनकी (विशेष प्रतिनिधी :
       (एशिया मंच न्युज)

        बुलढाणा जिल्ह्यात रोजगारासाठी मजुर वर्ग काम मिळण्याठी वणवण भटकत आहे, तर दुसरीकडे जिल्ह्यात जिगांव प्रकल्पाचे काम सुरु असुनही स्थानिक मजुर वर्ग कामापासुन वंचीत असल्याने कामगारांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. संग्रामपूर तालुक्यात विविध कामे सुरु असुन यामध्ये आलेवाडी धरण हे मोठे प्रकल्प असुन याचे काम अंतिम टप्प्यांत आले असून स्थानिक मजुरांना डावलून परप्रांतीय मजुरांना काम देण्यात येत आहे.

        सदर संग्रामपूर तालुका हा आदिवासी बहुल भाग म्हणून ओळखला जातो. गेल्या कित्येक वर्षांपासून संग्रामपूर तालुक्यात सिंचन व्यवस्था नसल्यामुळे परिसरातील शेतकरी वर्ग हवाल दिला होता. शेतकरी वर्गाला सिंचनाची सोयी सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून शासनाने संग्रामपूर तालुक्याला सिंचन होऊन या भागातील शेतकऱ्यांना लाभ मिळावा याकरीता  चोंडी, अरकचेरी, टाकळेश्वर , आलेवाडी या ठिकाणी धरण उपलब्ध करून देत. यामध्ये आलेवाडी धरण हे प्रामुख्याने येते. अलेवाडी धरणाला सन २००९ मध्ये मान्यता मिळाली असून संबंधित धरणाचा बांधकाम करण्याचा ठेका हा सांगली येथील कृष्णा कंपनीला दिला.

          संबंधित कामाबाबत मिळालेल्या माहिती नुसार प्रशासकीय मान्यता नुसार सन २००९ मध्ये ३२४ .६३ हेक्टर वर धरणाकरिता जमीन अधिग्रहित केल्या गेली. संबंधित काम गेल्या १५ वर्षांपासून कधी संत गतीने तर कधी जलद गतीने काम चालू आहे पण, संबंधित कामावर स्थानिक मजूर डावलून परप्रांतीय मजुरांना संधी देण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे निसर्गाच्या अवकृपेमुळे स्थानिक मजुरांना हाताला काम नाही. हीच परिस्थिती परराज्यातील असुन कमी दरामध्ये मजूर लावून काम करण्यात येत आहे. तर स्थानिक मजुरांचा विचार केल्या जात नाही. तरी याकडे शासन, प्रशासन, अधिकारी यांनी जातीने लक्ष देऊन या परिसरातील मजुर वर्गाला काम मिळावे, अशी रास्त मागणी मजुर वर्गाकडून होत आहे.