बुलडाणा जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले उत्तरची जिल्हा कार्यकारणी गठीत

बुलडाणा जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले उत्तरची जिल्हा कार्यकारणी गठीत 
जळगांव जामोद : (एशिया मंच न्युज)
       बुलडाणा जिल्हा रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडीया आठवले गटाची उत्तर (घानाखाली) ची जिल्हा कार्यकारणी 
 १ जानेवारी २०२५ रोजी जळगाव जामोद येथे रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाची जिल्हा बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये केंद्रीय समाजिकन्याय राज्यमंत्री भारत सरकार तथा राष्ट्रीयध्यक्ष रिपाई नामदार डॅा. रामदासजी आठवले यांच्या आदेशाने बुलडाणा जिल्ह्याची घाटाखालची (उत्तर) कार्यकारणी घोषित करण्यात आली. 
        सर्व प्रथम फुले, शाहू, आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात येऊन त्यांचा परिचय करून दिला.  यावेळी जळगाव जामोदचे विकास मुर्ती लोकप्रिय आमदार मजा मंत्री डॅा. संजयजी कुटे यांचा रिपाइं आठवले गटाकडून भव्यदिव्य पुष्पमाला देऊन सत्कार केला व त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व स्वराज्य संस्था, शासकीय कमेट्यावर आम्हाला युतीच्या मित्र पक्ष या नात्याने आम्हाला सामावुन घ्यावे अशी रिपाई कडून मागणी केली. 
     या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब सरदार हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष जळगाव जामोद तालुका अध्यक्ष संतोष वानखेडे होते. कार्यक्रमांमध्ये आपल्या प्रमुख मार्गदर्शनात भाऊसाहेब सरदार यांनी पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी घर तिथे कार्यकर्ता गाव तिथे शाखा हे अभियान राबवण्याच्या आव्हान केले. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे कार्यकर्ते यांना निवडून आणण्यासाठी महायुती मध्ये राहून त्यांना निवडून आणायचं आवाहन केले. महायुतीने जर आपल्याला जागा सोडल्यास आपण आपल्या चिन्हावर ऊस धारक शेतकरी या चिन्हावर आपले कार्यकर्ते उभे करून त्यांना निवडून आणण्यासाठी मित्र पक्षाच्या सहकार्याने प्रयत्न करावे, अशी आव्हान केले. जर त्यांनी सन्मानपूर्वक आपल्या पक्षास जागा न सोडल्यास पक्षाचे आदेश घेऊन स्वबळावर लढण्याची ही तयारी कार्यकर्त्यांनी  ठेवावी. 
   यावेळी नविन जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली असून यामध्ये  जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब सरदार, जिल्हा महासचिव नीलकंठ सोनवणे, जिल्हा कायदेशीर सल्लागार रवींद्र निकम, जिल्हा उपाध्यक्ष सुनील इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष भगवान इंगळे ,जिल्हा उपाध्यक्ष सुनील अहिरे , जिल्हा सचिव भास्कर भटकर ,जिल्हा सचिव इल्यास खान इस्माईल खान ,जिल्हा सचिव प्रमोद दिलीप तायडे ,जिल्हा संघटक मुक्तार खान उस्मान खान ,जिल्हा महिला अध्यक्ष रोशनीताई कबीरदास , जिल्हा सदस्य संजय भारसाकळे , जिल्हा सदस्य सर्वश्री प्रमोद नाईक, विश्वनाथ वानखेडे, अमोल शेगोकार तर तालुकाध्यक्ष बाबुलाल इंगळे संग्रामपूर , संतोष वानखेडे जळगाव जामोद ,शैलेश वाकोडे नांदुरा ,दिलीप इंगळे मलकापूर ,सुरज शेगोकार शेगाव ,निर्मलाबाई रणीत महिला तालुका अध्यक्ष मलकापूर यांची नियुक्ती करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबुलाल इंगळे यांनी केले तर आभार दिलीप इंगळे यांनी मानले.  कार्यक्रमाला जिल्हाभरातील पदाधीकारी सभासद बहूसंख्येने हजर होते. राष्ट्रगितानी कार्यक्रमाची सागता झाली.