बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
नेपाळ येथे झालेल्या शूटिंग बॉल स्पर्धेमध्ये नेत्रदीपक कामगिरी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिल्याबद्दल गौरी म्हस्के हिचा केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी अभिनंदन करत सत्कार केला आहे.
नेपाळ येथे 1 व 2 फेब्रुवारीला झालेल्या शूटिंग बॉल स्पर्धेमध्ये गौरी म्हस्के हिने भारत -पाकिस्तान सामन्यामध्ये दमदार कामगिरी करत भारताला विजयश्री मिळून दिला, त्यामुळे तिची निवड विश्व कप शूटिंग बॉल स्पर्धेसाठी झाली आहे. गौरी म्हस्के ही बुलढाणा जिल्ह्यातील पंढरदेव येथील रहिवासी असून ती शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मायाताई म्हस्के यांची कन्या आहेत. नेपाळ येथे झालेल्या भारत-नेपाळ , भारत-बांगलादेश आणि भारत- पाकिस्तान या शूटिंग बॉल सामन्यांमध्ये तिने व तिच्या संघाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारताला विजय मिळाला. केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी गौरी म्हस्के हिचे कौतुक करत तिच्या टीमचेही अभिनंदन
केले आहे.