मेहकर : (एशिया मंच न्युज)
सुलतानपूर तालुका लोणार येथे नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थ खरात यांचा निवडून आल्याबद्दल पहिल्यांदाच भव्य नागरी सत्कार समारंभाचे आयोजन 1 फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते. येथील तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा बसवण्यात यावा, अशी मागणी केली होती, त्यावेळी आमदार सिद्धार्थ खरात यांनी सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले की, येथे लवकरच छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात येईल असा, शब्द दिला होता, त्यानुसार येथिल तरुण युवकांनी, नागरिकांनी लोक वर्गणी जमा करून भव्य असा पुतळा बसविला.
आज आमदार सिद्धार्थ खरात हे सुलतानपूर येथे कार्यक्रमाला गेले असता यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन केले. येथील जागेची पाहणी केली व पुतळ्याचा चबुतरा व परिसराचे सुशोभीकरण व हाय मास्ट लाईट आमदार निधीतून दोन महिन्याच्या आत देण्यात येईल येईल,असा शब्द यावेळी दिला. आमदार सिद्धार्थ खरात हे शिव, शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्या परिवर्तनवादी विचारांचे पाईक व संत तुकाराम महाराज यांची वारकरी चळवळ बळकट करण्यासाठी संत महंत यांच्या विचाराचेही पाईक आहेत.
आमदार सिद्धार्थ खरात यांनी दिलेला शब्द ते प्रत्यक्षात कृतित आणतात. छत्रपती शिवाजी महाराज व त्याच बरोबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ सुद्धा हायमास्ट लाईट देण्यात येईल. टप्याटप्याने येथील नागरिकांच्या मागणी नुसार सभा मंडप व गावातील रस्ते, नाल्यांचे कामे करण्यात येतील असेही, आश्वासन आमदार सिद्धार्थ खरात यांनी यावेळी दिले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप वाघ, सागर पनाड, बंडू जोगदंड (शहर प्रमुख शिवसेना सुलतानपूर),लालू भाई (युवासेना शहर प्रमुख सुलतानपूर) सुरज साठे, शंकर पंडित, अजय सुरुशे, नागेश सोनुने, रमेश भानापुरे, हर्षल इंगोले, शेख जावेद , संतोष चेके, सुरज साठे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.