बुलढाणा येथे राज्यस्तरीय बंजारा वधु-वर परिचय मेळावा

बुलढाणा येथे राज्यस्तरीय बंजारा वधु-वर परिचय मेळावा 
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
         गोर बंजारा वधु-वर परिचय मेळावा 2 फेब्रुवारी 2025 रोजी मोठ्या उत्साहात स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी हॉल येथे संपन्न झाला. या मेळाव्यात संपूर्ण महाराष्ट्रातून वधू-वर सहभागी झाले होते. समाजातील अनेक मान्यवर, साहित्यिक, अभियंते, सामाजिक कार्यकर्ते, व महिलांनी उपस्थिती दर्शवली.

       कार्यक्रमात विवाह इच्छुक घटस्फोटित, विधुर, विधवा आणि दिव्यांग वधू-वरांसाठीही विशेष संधी उपलब्ध करून देण्यात आली. सामाजिक एकजुटीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे आयोजन विलास रामावत यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. हा उपक्रम समाजातील युवक-युवतींसाठी आणि सामाजिक बांधिलकी दृढ करणारा ठरला. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांची गरज आहे. या मेळाव्यात सूत्रसंचालन सचिन राठोड लोणार, प्रा. अजय सर यांनी केले. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून विधुर विधवा, दिव्यांग घटस्फोट, वधू-वर सहभागी झाले होते. समाजातील जानूसिंग महाराज मोहनागड, चंपालाल महाराज , साहित्यिक मांगीलाल राठोड, उपअभियंता अमोल जाधव, विनायक राठोड सिंदखेड राजा माजी सभापति, श्रावण जाधव सर, मालेगाव, बुलढाणा नायक राजू राठोड, अभियंता दयाराम जाधव, कारभारी विट्ठल चव्हाण, गजानन राठोड सर, रघुनाथ जाधव, रामेश्वर चव्हाण, विजय राठोड कर्मचारी संघ, सुभाष रामावत, परीक्षित चव्हाण, सुभाष आडे सरपंच, या कार्यक्रमासाठी संभाजीगर येथून योगीराज राठोड, डॉ. विलास राठोड, डिगाबर राठोड , अकोला येथून गोर नायकण बंजारा महिला संघ राज्य सचिव लताताई राठोड, रंजन चव्हाण, संगीता राठोड, संध्याताई, छायाताई चव्हाण, (नावलेरी वेतडू मॅट्रिमोनीचे मालक) उपस्थित होत्या. तसेच सेवादळ बुलढाणा अध्यक्ष ईश्वर चव्हाण, भजनकारी संघाचे जिल्हा अध्यक्ष सुरेश महाराज ,चिखली ता.अध्यक्ष रवि महाराज, आरक्षण बचाओ समितिचे अध्यक्ष राजेश राठोड, तसेच वेगवेगळ्या जिल्ह्यातील समाज बांधव उपस्थित होते.
       सेवादल समाज राष्ट्र चळवळ च्या माध्यमातून हा अभियान राबविण्यात आले. कार्यक्रमाला घटस्फोट, विदुर, विधवा दिव्यांग सुध्दा वधू वर उपस्थित होते. हा उपक्रम विलास रामावत यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात  संपन्न झाला.