किल्ले ऊभारणी स्पर्धेतुन गृह संघटीत करण्याची प्रेरणा मिळते : गजानन जोगळेकर

किल्ले ऊभारणी स्पर्धेतुन गृह संघटीत करण्याची प्रेरणा मिळते : गजानन जोगळेकर 
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
         विद्यार्थ्यांच्या बुध्दीला व त्यांचेतील एका गुणाला चालना मिळावी म्हणुन विविध स्पर्धा आयोजित करण्यात येतात. परंतु, गड किल्ले, दुर्गाची ऊभारणी करण्याची संकल्पना म्हणजे संघटीत प्रकारे स्पर्धा घेण्याचा प्रकार आहे. यापासुन आपले कुटुंब सुरक्षित कसे ठेऊ शकतो. ही प्रेरणा मिळते, यातुन गृह संघटीत करण्याची भावना निर्माण होते, असे प्रतिपादन गजानन जोगळेकर यांनी केले.

        रविवार २ फेब्रुवारी रोजी श्री ओम क्लासेस येथे स्व.श्रीरंग पाटणकर स्मृती गडकिल्ले उभारणी स्पर्धेचा बक्षीस समारंभ संपन्न झाला. बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षपदावरुन जोगळेकर बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून सुमित ठाकरे ,आरती जाधव , लक्ष्मीकांत बगाडे, गजानन जोगळेकर, नितीन जाधव, अरुण सौभागे, संजय देवल हे होते. कार्यक्रमाचे संचलन प्रेषित सिद्धभट्टी यांनी तर आभार प्रदर्शन श्रीराम भोसले यांनी केले.  

        याप्रसंगी सशस्त्री सीमादलाम डीवायएसपी पदी नियुक्ती झाल्याबद्दल सुमित सुखदेव ठाकरे व ग्राम पंचायत अधिकारी झालेल्या आरती मधुकरराव जाधव ह्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आरती जाधव हिने आपल्या शिक्षणाला मदत मिळाल्यानंतरच आपण यश प्राप्त करु शकलो आहोत, त्यामुळे आपणीही सहकाराची भावना जोपासावी असे सत्काराला उत्तर देतांना सांगितले. तर सुमित ठाकरे यांनी कठोर परिश्रम , एकाग्र मन हीच यशाची त्रिसूत्री असल्याचे सांगितले.

* अभ्यासाचे व्यसन करा : 
        गड किल्ले तयार करतांना इतिहासाची आठवण येते. शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ला कसा साकारला असेल, त्या किल्ल्यावर काय घडले असेल, असे प्रश्न निर्माण होऊन इतिहासाचा अभ्यास होते, असाच अभ्यास भुगाल विषयाचा केला, सध्याच्या घडामोडीवर लक्ष घातले तर फ्युचर  ब्राईट राहील, कोठेतरी आपण आपल्या आवडीप्रमाणे नाेकरीवर कौशल्य विकासावर आधारीत राेजगार मिळवाल. या करता अभ्यासाचे व्यसन जाेडा, इतर व्यसनांपेक्षा हे व्यसन बरे आहे, असे मार्गदर्शन लक्ष्मीकांत बगाडे यांनी केले.

       गडकिल्ले उभारणी स्पर्धेचा निकाल
 प्रथम क्रमांक श्रीनिका संदेश पाटील, अनुराधा संदेश पाटील, संदेश रमेश पाटील, द्वितीय क्रमांक आरुष प्रमोद चव्हाण, काव्या प्रमोद चव्हाण, वेदिका दत्तात्रय काकडे, क्रिष्णा श्रीकांत देवीकार , तृतीय क्रमांक प्राप्ती विलास जाधव, चतुर्थ क्रमांक अर्णव ओंकार गोडबोले, रूजुला ओंकार गोडबोले, श्रीशा वैभव गोडबोले आदी विजेत ठरले. या विजेत्यांना स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी मंडळाचे श्याम खारोडे, श्रीराम भोसले, आनंद पाटणकर, वैभव गोडबोले यांनी परिश्रम घेतले.