नाफेड अंतर्गत सुरू असलेल्या शासकीय खरेदी केंद्रांना मुदत वाढ द्या : अन्यथा शेतकऱ्यांचे हितासाठी शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल - जालिंदर बुधवत

नाफेड अंतर्गत सुरू असलेल्या शासकीय खरेदी केंद्रांना मुदत वाढ द्या : अन्यथा शेतकऱ्यांचे हितासाठी शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल - जालिंदर बुधवत
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
          काही दिवसापूर्वी नाफेड अंतर्गत सुरू करण्यात आलेली शासकीय खरेदी केंद्र बारदाण्या अभावी बंद पडले होते. आता या शासकीय खरेदी केंद्राची मुदत संपत आलेली आहे. शेतकऱ्यांच्या घरातील सोयाबीनचा शेवटचा दाणा खरेदी होईपर्यंत ही खरेदी केंद्र सुरू ठेवण्यात यावी यासाठी आज  ३१ जानेवारी २५ रोजी जिल्हाधिकारी बुलढाणा यांना जालिंदर बुधवत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख बुलडाणा यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.

         यावेळी जालींधर बुधवत पुढे म्हणाले की, मायबाप शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन पडून आहे. योग्य भाव मिळत नसल्याने आर्थिक संकट उभे ठाकले आहे. त्यात बारदाना अभावी सोयाबीन खरेदी न करण्यासाठी टाळाटाळ करण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली होती. सोयाबीन हया शेतमालाला मार्केट मध्ये योग्य भाव नसल्यामुळे नाफेड अंतर्गत शासकीय खरेदी सुरु करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या घरात अजुन फार मोठ्या प्रमाणात सोयाबीन असुन सदरील खरेदी ही संथगतीने सुरु आहे. शेतमाल केंद्रावर बोलल्यानंतर सदरील शेतमालामध्ये मॉईश्चर, काडी कचरा, फुटतुट, डागी प्रमाण अशी कारणे देऊन शेतकऱ्यांचा माल सोयाबीन खरेदी करण्यास टाळाटाळ करण्यात येते. त्यातच ३१ जानेवारीपर्यंत या खरेदी केंद्रांना मुदत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या घरातील सोयाबीनचा शेवटचा दाणा खरेदी होईपर्यंत ही खरेदी केंद्र सुरू ठेवण्यात यावीत, त्यांना मुदतवाढ देण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. संपुर्ण शेतकऱ्यांची घरात असलेली सोयाबीन मोजणी होईपर्यंत खरेदी केंद्रे बंद करू नये, अन्यथा शेतकऱ्यांचे हितासाठी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

        निवेदन देतेवेळी तालुका प्रमुख लखन गाडेकर, विजय इंगळे, किसान सेना उप जिल्हा प्रमुख अशोक गव्हाणे, माजी सभापती सुधाकर आघाव, युवासेना तालुका प्रमुख संजय शिंदे, अपंग सेलचे गणेश सोनुने, दलीत आघाडीचे तालुका प्र. बबन खरे, आशिष बाबा खरात, उप तालुका प्रमुख संजय गवळी, सुनील गवते, विजय इतवारे, बाजार समितीचे संचालक हरी सिनकर, किशोर कानडजे, मोहम्मद सोफियान, अनिकेत गवळी, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष रामेश्वर शिंदे, निर्मलकुमार इंगळे, राहुल जाधव, अनिल राणा, डिंगबर दळवी, विरेंद्र बोर्डे, रवी गोरे, मुकुंदा काळे यांचेसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.