संस्कारक्षम नविन पिढी मातृशक्ती घडवू शकते : डॉ. रमाताई गोळवलकर* विराट नारी शक्ती महिला संमेलन

संस्कारक्षम नविन पिढी मातृशक्ती घडवू शकते : डॉ. रमाताई गोळवलकर
* विराट नारी शक्ती महिला संमेलन
बुलढाणा : (एशिया मंच वृत्त)
        एक पणती अंधारातून लख्ख प्रकाश देऊन अज्ञान दूर करते सुर्यदेव माणसाच्या मनात बुध्दी आत्मा प्रकाशीत करतो. सुर्यबुध्दी प्रत्येकाच्या मनात सत्कार्याची भावना रुजविते, कार  मातृशक्तीच्या माध्यमातून कुटुंबाची देशाची राष्ट्रभक्ती संरक्षण आत्मनिर्भरतेची शक्ती रूपे नारीशक्ती सर्वच क्षेत्रात नावलौकिक करून मातृत्व, कतृत्व, नेतृत्व सिद्ध करण्याचे विचार संमेलातून घेऊन जातांना नविन पिढी घडविण्याची शक्ती मातृशक्तीत आहे. ती जागृत ठेवा, असे आवाहन संवादशास्त्र भारतीय विद्या अभ्यासक डॉ. रमाताई गोळवलकर (नागपूर) यांनी केले.
          मॉ जिजाऊ नारीशक्ती संगम महिला संमेलन बुलढाणा येथील सहकार विद्या मंदिर सभागृहात  3 डिसेंबर 2023  रोजी दुपारी संपन्न झाले. हजारो महिला युवतीच्या उपस्थितीत पार पडलेल्या या संमेलनाच्या व्यासपीठावर प्रमुख अतिथी श्री भागवत कथा हभप साध्वी त्रिवेणी दिदी देशमुख (शेंदूर्जन), प्रांत संयोजिका महिला समन्वय मीरा कडबे (नागपूर), संमेलन प्रमुख पद्मजा अहिर उपस्थित होत्या.
        
      समारोप सत्रात बोलतांना राष्ट्र सेविका समिती विदर्भ प्रांत बौध्दीक प्रमुख सौ. आरती तिवारी(चांदूरबाजार) यांनी सांगितले, समाजातील दारिद्ररेषेचे कुटुंब त्यांच्या समस्या, आदीवासीना सर्वांगीण विकासाच्या योजना राबवितांच्या त्यांचे पर्यंत पोहचले पाहिजे त्यासाठी निर्णय, उपाय आर्थिक सामाजिक भावनीक धाग्यादोर्‍यांनी गुरफटले आहे. त्याची उकल होणे आवश्यक आहे. 

     प्रारंभी दिपप्रज्वलन, भारतमाता पूजन, दुर्गावाहिनीचे शौर्य प्रात्याक्षिक, वैयक्तीक गीत डॉ. प्राजक्ता हजबनिस यांनी सादर केले. प्रास्ताविक संमेलन प्रमुख पदमजा अहीर सुत्रसंचलन जयश्री कविमंडन, दिपाली देशपांडे, मेघा गोठी आभार संमेलन सहसंयोजिका विजया राठी यांनी मानले. याप्रसंगी रा.स्व. संघाचे विभाग संघचालक चित्तरंजन राठी, जिल्हा संघचालक सुभाष मोरे बाळासाहेब काळे, बुलढाणा विभाग कार्यवाह विजय पुंडे, सहकार्यवाह सनिल निमावत, विभाग प्रचारक स्वप्निल राऊत, विदर्भ प्रांत कुटुंब प्रबोधनी प्रमुख राजेंद्र उमाळे, अजय नवघरे, बुलढाणा नगर संघचालक महेश पेंडके यासह विविध विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते.