* जमिनीतील पिकावर नव्हे तर आमच्या हृदयावरच ट्रॅक्टर फिरल्याच्या शेतकऱ्यांच्या भावना
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
शेतकऱ्यांवरील संकट कमी होण्याऐवजी उलट वाढतांना दिसत आहे अस्मानी सह सुलतानी संघटने शेतकरी पुरता हताश होताना दिसत आहे अशातच खरीप पिक हातातून निघून गेल्यानंतर आता अवकाळी पाऊस आणि वातावरणात झालेल्या बदलामुळे रब्बी पिकावर देखील विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने बुलढाणा जिल्ह्याच्या शेतकऱ्याने आपल्या 10 एकर हरभरा पिकावर रोटावेटर फिरवला आहे.
बुलढाणा तालुक्यातील चिखला येथील हरिदास खांडेभराड यांच्याकडे 14 एकर जमीन आहे. यामध्ये त्यांनी खरीपामध्ये सोयाबीनची पेरणी केली होती, मात्र उत्पन्नात मोठी घट झाल्याने त्यांचा जमतील खर्च निघाला त्यामुळे त्यांना आता रब्बी पिकांवर मोठी आशा होते, त्यामुळे त्यांनी आपल्या 10 एकर शेतात हरभरा पिकाची लागवड केली त्याला जवळपास पावणेदोन लाख रुपये खर्च आला मात्र अतिवृष्टी अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावर बुरशी, दह्या रोग आणि अळीचा प्रादुर्भाव झाल्याने त्यांचे उभे पीक जळत आहे. आणि त्यामुळे या शेतकऱ्याने छातीवर दगड ठेवून या संपूर्ण 10 एकरातील हरभरा पिकात रोटावेटर घालून पीक उध्वस्त केले आहे.
हरिदास खांडेभराड यांच्यावर यांनी खरीप पेरणीसाठी विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँकेचे साडेतीन लाख रुपये कर्ज घेतलेले आहे तर खाजगी पतसंस्थेचे देखील त्यांच्याकडे 2 लाख रुपयांचे कर्ज आहे आणि आता त्यांचा रब्बी पिका जवळपास पावणेदोन लाख रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे, त्यामुळे आता बँकेचे कर्ज कसे द्यायचे या युवा शेतकरी याला पडलाय. हाताच्या फुलाप्रमाणे जपलेल्या पिकावर रोटावेटर चालवताना हे रोटावेटर पिकावर नव्हे तर आमच्या हृदयावर चालत असल्याच्या भावना यावेळी शेतकरी हरिदास खांडेभराड यांनी व्यक्त केले आहेत. सोबतच राज्य शासनाने शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.