बुलढाणा येथे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा विराजमान

बुलढाणा येथे  छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा विराजमान
बुलढाणा : (एशिया मंच वृत्त)
         बुलढाणा शहरातील संगम चौक येथे  हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा असंख्य शिवभक्तांच्या साक्षीने तसेच बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा शिवस्मारक समितीचे कार्याध्यक्ष धर्मवीर 
 संजय  गायकवाड यांच्या भगीरथ प्रयत्नातून समस्त शिवस्मारक समितीच्या उपस्थितीमध्ये आज रोजी पूर्णत्वास आला आहे...!
      ४ डिसेंबर २०२३ रोजी असंख्य शिवभक्तांच्या साक्षीने शहरातील सर्व समाजातील संत-महापुरुषांच्या स्मारकसमिती पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा भव्य-दिव्य विराजमान सोहळा पार पडला. यावेळी  असंख्य शिवप्रेमी तसेच शिवस्मारक समितीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी तथा सदस्य उपस्थित होते.  छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा संगम चौकात विराजमान झाल्याने बुलडाणा जिल्ह्याच्या वैभवात भर पडली आहे.