* जिल्हाध्यक्ष जयश्री वाघ तर जिल्हाउपाध्यक्ष सपना म्हस्के यांची बिनविरोध निवड
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
जिल्हा नर्सेस असोसिएशनची नविन कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हाध्यक्षपदी जयश्री वाघ तर जिल्हा उपाध्यक्षपदी सपना अनिल म्हस्के यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
महाराष्ट्र शासकीय नर्सेस फेडरेशनच्या राज्याध्यक्षा इंदुमती थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यकार्याध्यक्ष वर्षा पागोटे व जिल्हा रुग्णालयाच्या सहाय्यक अधिसेविका कुरुसिंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शासकीय परिचारिका महाविद्यालय बुलढाणाच्या प्राचार्या उज्वला खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली बुलढाणा जिल्ह्यातील परिचारिकांची संघटना बांधणी संदर्भात महत्त्वाची बैठक १५ डिसेंबर रोजी जिल्हा रुग्णालयात पार पडली.
प्रारंभी राज्य कार्याध्यक्षा वर्षा पागोटे यांनी संघटनेची स्थापना, उद्देश, संघर्ष, आंदोलने, नियमावली व पुढील वाटचाल यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. त्यानंतर उपस्थित सभासदांमधून संघटनेच्या जिल्हा कार्यकारणीची एकमताने निवड करण्यात आली. त्यानुसार जिल्हा कार्याध्यक्षपदी जयश्री वाघ तर जिल्हा उपाध्यक्षपदी सपना अनिल म्हस्के यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच उर्वरित कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी मंगेश शिरसाट, सचिवपदी संदीप अढाव, सहसचिव रॉबर्ट खंडारे व सोमानाथ खंडाळकर, कार्याध्यक्ष शीतल मोगल, माधुरी मोरे, प्राजक साबळे, सुजाता राजपूत, कोषाध्यक्ष प्रशांत थोरात, सहकोषाध्यक्ष सरला देशमुख, सुनंदा फुसे, संपर्क प्रमुख अमित किन्हीकर, मालती करोडपती, जिल्हा संघटक शुभदा पावडे, पौर्णिमा जाधव, सपना काकडे, अरुण नागरगोजे, रंजना मुंडे, प्रमुख सल्लागार मीना निकम, उज्वला खेडेकर यांचा समावेश आहे. या निवडीनंतर नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
* सर्वांनी सहभागी व्हावे :
जिल्ह्यातील सर्व परिचारिकांच्या सर्वांगीण विकासासाठी व परिचारिकांच्या समस्या तसेच कर्तव्यावर येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी संघटना एकजूटपणे काम करणार आहे. संघटना अधिक बळकट करण्यासासाठी जिल्ह्यातील सर्व परिचारिकांनी सहकार्य करावे आणि संघटनेत सहभागी व्हावे, असे आवाहन नवनिर्वाचीत जिल्हाध्यक्ष, जिल्हाउपाध्यक्ष व कार्यकारिणीने केले आहे.